For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सात्विक-चिराग क्वार्टरफायनलमध्ये, पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात

06:00 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
सात्विक चिराग क्वार्टरफायनलमध्ये  पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात
Advertisement

वृत्तसंस्था/जकार्ता

Advertisement

इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत गुऊवारी येथे झालेल्या सामन्यात भारताची अव्वल पुऊष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला, तर दोन वेळची ऑलिंपिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूला महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभूत व्हावे लागले. 2023 चे विजेते सात्विक आणि चिराग यांनी दबावाला तोंड देत रासमुस कजेर आणि फ्रेडरिक सोगार्ड या जागतिक क्रमवारीतील 16 व्या स्थानावर असलेल्या डॅनिश जोडीवर 68 मिनिटे चाललेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत 16-21, 21-18, 22-20 असा विजय मिळवला.

गेल्या आठवड्यात सिंगापूर ओपन सुपर 750 च्या उपांत्य फेरीत पोहोचलेले सात्विक आणि चिराग यांच्या रुपाने स्पर्धेत एकमेव भारतीय आव्हान जिवंत राहिले आहे. या एकवेळ जागतिक यादीत अव्वल राहिलेल्या जोडीचा पुढील सामना मलेशियाच्या सातव्या मानांकित

Advertisement

मॅन वेई चोंग आणि काई वुन टी यांच्याशी होईल. ‘आजचा दिवस आम्ही सर्वोत्तम स्थितीत नसलेल्या दिवसांपैकी एक असल्यासारखा वाटला. रणनीती चुकीची होती असे नव्हे, तर आम्ही गुण बहाल केले. जर तुम्ही मागे वळून पाहिले, तर जवळजवळ 15 ते 20 गुण आमच्या स्वत:च्या चुकांमुळे बहाल झाले. त्यांनी ते गुण जिंकले नाहीत, आम्ही ते दिले. तरीही, आम्ही स्वत:वर विश्वास ठेवला आणि एका वेळी एका गुणावर लक्ष केंद्रीत करत गेलो’, असे सात्विकने सांगितले.

तत्पूर्वी, सिंधू निर्णायक गेममध्ये अपयशी ठरली. दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत 8 व्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगकडून तिला पराभव पत्करावा लागला. 78 मिनिटांच्या या संघर्षपूर्ण लढतीत सिंधूने निर्णायक गेममध्ये 15-11 अशी असलेली आघाडी गमावली आणि 22-20, 10-21, 18-21 असा पराभव तिला पत्करावा लागला. उर्वरित भारतीय संघासाठी हा निराशाजनक दिवस राहिला. कारण सतीश कऊणाकरन आणि आद्या वरियथ यांच्यासह गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली या महिला दुहेरी जोडीलाही दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. सतीश आणि आद्या यांना सहाव्या मानांकित थायलंडच्या देचापोल पुवारानुक्रोह आणि सुपिसारा पावसमप्रान या जोडीने फक्त 25 मिनिटांत 7-21, 12-21 असे नमविले, तर गायत्री आणि ट्रीसा यांना 46 मिनिटांत जपानच्या युकी फुकुशिमा आणि मयू मात्सुमोतो यांच्याकडून 13-21, 22-24 असा पराभव पत्करावा लागला.

दुखापतीतून परतल्यानंतर केवळ दुसरी स्पर्धा खेळणाऱ्या सात्विक आणि चिराग यांना पहिल्या गेममध्ये बरीच झुंज द्यावी लागली. कारण डेन्मार्कच्या जोडीने बहुतेक लहान रॅली जिंकल्या. एका वेळी भारतीय जोडी 6-10 ने पिछाडीवर होती आणि जरी त्यांनी सलग चार गुणांसह बरोबरी साधली असली, तरी डॅनिश जोडीने पहिला गेम जिंकत आघाडी मिळविली. दुसरा गेम चुरशीचा ठरून भारतीयांनी प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणला. 14-14 अशा स्थितीतून सात्विक आणि चिरागने सलग पाच गुण मिळवून निर्णायक गेममध्ये सामना नेण्यास भाग पाडले. तिसऱ्या गेममध्ये त्यांनी हीच गती कायम ठेवली आणि 5-1 अशी आघाडी घेतली. पण सात्विकच्या दोन चुकांमुळे डेन्मार्कने पुन्हा 8-8 अशी बरोबरी साधली. त्यानंतर पारडे दोन्ही बाजूंनी झुकत राहून शेवटी 20-20 अशी बरोबरीची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर चिरागने मॅच पॉइंट मिळविण्यासाठी एक उत्तम सर्व्हिस केली आणि सात्विकने अचूक रिटर्न करून विजयावर शिक्कामोर्तब केला.

Advertisement
Tags :

.