For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सात्विक-चिरागचे प्रशिक्षक निवृत्त

06:38 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
सात्विक चिरागचे प्रशिक्षक निवृत्त
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

पुरुष दुहेरीतील अव्वल बॅडमिंटन जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. सात्विक आणि चिराग यांचे प्रशिक्षक मथायस बोए यांनी प्रशिक्षक क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहिर केली.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत मथायस बोई यांच्या मार्गदर्शनाखाली सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने अनेक अव्वल बॅडमिंटन स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखत काही कालावधीसाठी त्यांनी पुरुष दुहेरीच्या मानांकनात अव्वल स्थान मिळविले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सात्विक आणि चिराग यांच्याकडून पदकाची अपेक्षा बाळगली जात होती. पण गेल्या गुरुवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मलेशियाच्या चिया आणि यिक यांनी सात्विक आणि चिराग यांचा 13-21, 21-14, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. पॅरिस ऑलिम्पिकमधील सात्विक आणि चिराग यांच्या कामगिरीचे बोए& यांनी कौतुक करत त्यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. बोए& यांच्या मार्गदर्शनाखाली सात्विक आणि चिराग या जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण तसेच विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. 2024 चा बॅडमिंटन हंगाम चिराग आणि सात्विक यांना बराच यशस्वी ठरला. या कालावधीत त्यांनी विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या टूरवरील दोन स्पर्धा जिंकल्या असून मलेशियन आणि इंडिया खुल्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.