महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सात्विक-चिरागची उपांत्य फेरीत धडक

06:55 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रणॉय, मालविका, त्रीसा-गायत्री, ध्रुव-तनिशा, सतीश आद्या यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ कौलालंपूर

Advertisement

येथे सुरू असलेल्या मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पुरुष दुहेरीची स्टार जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुष एकेरीत एचएस प्रणॉय, महिला एकेरीत मालविका बनसोड, दुहेरीत त्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद, मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो, सतीश-आद्या यांचे आव्हान संपुष्टात आले.

या सातव्या मानांकित भारतीय जोडीने 49 मिनिटांत मलेशियाच्या यू सिन आँग व ई यी तेवो यांच्यावर 26-24, 21-15 अशी मात केली. मागील वर्षी सात्विक-चिराग जोडी या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. त्यांची उपांत्य लढत दक्षिण कोरियाच्या वोन हो किम व स्यूंग जेइ सेओ यांच्याशी होणार आहे. या लढतीचा पहिला गेम अतिशय चुरशीचा झाला. दोन्ही जोड्यांनी तोडीस तोड खेळ केल्यानंतर भारतीय जोडीने मध्यंतराला 11-9 अशी किंचीत आघाडी घेतली होती. नंतर त्यांनी ही आघाडी 18-16 अशी केली. पण मलेशियन जोडीने मुसंडी मारत सलग तीन गुण जिंकून त्यांना 19-19 वर गाठले. सात्विक-चिरागने विचलित न होता संयमी खेळ करीत चार गेम पॉईंट्स वाचवले आणि नंतर हा गेम 26-24 असा घेत आघाडी मिळविली. दुसऱ्या गेममध्ये मलेशियन जोडीने जोरदार सुरुवात केली आणि बराच वेळ वर्चस्व राखत मध्यंतराला 11-8 अशी आघाडी घेतली. पण सात्विक-चिरागने जबरदस्त मुसंडी मारत नंतरच्या 17 पैकी 13 गुण जिंकत गेमसह सामना जिंकून सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याआधी शेवटच्या सोळा फेरीत भारतीय जोडीने मलेशियाच्या एन अझरीन व टॅन डब्ल्यूके यांच्यावर 21-15, 21-15 अशी मात केली होती.

पुरुष एकेरीत एचएस प्रणॉयला चीनच्या लि शि फेंगकडून चुरशीच्या लढतीत 8-21, 21-15, 21-23 अशी मात केली. दुखापतीतून सावल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकनंतर पुनरागमन करणाऱ्या प्रणॉयने पहिला गेम गमविल्यानंतर दुसरा गेम जिंकून आव्हान जिवंत ठेवले. निर्णायक तिसरा गेमही चुरशीचा झाला आणि त्यात अखेर शि फेंगने 23-21 अशी बाजी मारत आगेकूच केली. एक तास 22 मिनिटे ही लढत रंगली होती.

महिला एकेरीत मालविका बनसोडला जागतिक पाचव्या मानांकित व येथे तिसरे मानांकन मिळालेल्या चीनच्या हान युइकडून 18-21, 11-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनाही शेवटच्या सोळा फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या जिया यि फान व झांग शु झियान यांनी त्यांना 21-15, 19-21, 19-21 असे हरविले. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो यांनाही चीनच्या सातव्या मानांकित चेंग झिंग व झांग चि यांच्याकडून 44 मिनिटांच्या खेळात 13-21, 20-22 असा पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीतील अन्य एक जोडी सतीश करुणाकरन व आद्या वरियत यांनाही चौथ्या मानांकित मलेशियाच्या सून हुआर गोह शेवॉन जेमी लाय यांच्याकडून 10-21, 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article