For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सात्विक-चिराग यांना ‘खेलरत्न’ पुरस्कार प्रदान

06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
सात्विक चिराग यांना ‘खेलरत्न’ पुरस्कार प्रदान
Advertisement

खेलरत्न पुरस्कार प्रदान केल्यानंतर चिराग शेट्टी, डॉ. मनसुख मांडविय व सात्विक साईराज.

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांनी गुरुवारी बॅडमिंटनची स्टार जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांना मेजर ध्यान चंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करतेवेळी दोघेही उपलब्ध नव्हते. त्यामुळे दीर्घ काळ प्रलंबित राहिलेला हा सत्कार सोहळा गुरुवारी पार पडला. गेल्या वर्षी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. पण विविदा स्पर्धासाठी देशाबाहेर असल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते. गेल्या फेब्रुवारीत मांडविय यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार होता. पण त्यावेळी सात्विकचे वडील आर. कासी विश्वनाथन यांचे हृदयविकाराने निधन झाल्याने तो कार्यक्रमही लांबणीवर टाकण्यात आला होता.

Advertisement

पुरस्कार प्रदान केल्यानंतर मांडविय यांनी दोघांच्या छायाचित्रांसह पुरस्कार प्रदान केल्याचे एक्स हँडलवर सांगितले. दिल्लीतील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुख्यालयात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. सात्विक व चिराग हे भारतीय बॅडमिंटनमधील पुरुष दुहेरीचे प्रवर्तक बनले आहेत. त्यांनी 2022 आशियाई क्रीडा स्पर्धेत व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि 2023 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके पटकावली. बीडब्ल्यूएफच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविणारी व वर्ल्ड टूर सुपर 1000 स्पर्धा जिंकणारी सात्विक-चिराग ही एकमेव भारतीय जोडी आहे. 2023 मध्ये सात्विकने सर्वात वेगवान स्मॅश फटका मारणारा पुरुष बॅडमिंटनपटू बनत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले होते. त्याने 565 किमी प्रतितास इतक्या वेगाने स्मॅश मारला होता.

Advertisement
Tags :

.