महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सात्विक-चिराग, अश्मिता दुसऱ्या फेरीत, प्रणॉय पराभूत

06:05 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बँकॉक

Advertisement

भारताची पुरुष दुहेरीची स्टार जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी येथे सुरू झालेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली तर पुरुष एकेरीत पाचव्या मानांकित एचएस प्रणॉयचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. आपल्याच देशाच्या मीराबा लुवांग मैस्नमने त्याला पराभवाचा धक्का दिला.

Advertisement

अग्रमानांकित सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी मलेशियन जोडी नुर मोहम्मद अझरीन व टॅन वी किआँग यांना केवळ 34 मिनिटांच्या खेळात 21-13, 21-13 असे संपुष्टात आणले. सात्विक-चिराग यांची पुढील लढत चीनच्या झी हाओ नान व झेंग वेइ हान यांच्याशी होईल. प्रणॉयला मात्र पहिला अडथळा पार करण्यात अपयश आले. मीराबाकडून त्याला 19-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मीराबाची पुढील लढत डेन्मार्कच्या मॅड्स ख्रिस्तोफर्सेन याच्याशी होईल. ख्रिस्तोफर्सेनने भारताच्या किरण जॉर्जचा 21-15, 13-21, 21-17 असा पराभव करीत आगेकूच केली.

महिला विभागात अश्मिता चलिहाने पिछाडी भरून काढत इंडोनेशियाच्या ईस्टर नुरुमी ट्रि वार्डोयोवर 19-21, 21-15, 21-14 असा संघर्षपूर्ण विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. दुसऱ्या फेरीत तिचा मुकाबला चीनची अग्रमानांकित हान युई हिच्याशी होणार आहे. युईने भारताच्या मालविका बनसोडचा 21-11, 21-10 असा सहज पराभव केला. उन्नती हुडालाही पहिला अडथळा पार करण्यात अपयश आले. तिला बेल्जियच्या लियानी टॅनने 21-14, 14-21, 9-21 असे हरविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article