उपोषणाच्या बडग्याने सातवेतील अतिक्रमण जमीनधोस्त, स्वत्त:च उतरवले बांधकाम, उपोषण मागे
वारणानगर / प्रतिनिधी
क ॥ सातवे ता. पन्हाळा येथे स्मशानभूमीस लागून असलेले घराचे अतिक्रमण पन्हाळा पंचायत समिती समोर प्रभारी सरपंच उत्तम नंदूरकर यांच्या उपोषणाच्या बडग्याने आज सोमवार दि.२९ रोजी सकाळी जमीनधोस्त करण्यात आले. अतिक्रमण काढावे यासाठी पन्हाळा पंचायत समिती समोर दि. २६ जानेवारी पासून प्रभारी सरपंच उत्तम नंदूरकर यानी सुरु केले होते या आमरण उपोषणाला शनिवार दि.२७ रोजी सातवे येथे सर्व व्यवहार तसेच आठवडा बाजार कडकडीत बंद पाळून ग्रामस्थानी पाठींबा दिला होता.
पन्हाळा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यानी दोन दिवसात दोन भूमिका घेत तसेच चर्चेत वेळ काढून अखेर ग्रामपंचायतीने अतिक्रमण निर्मूलन करण्याचे आदेश देवून जबाबदारी झटकल्याचे पडसादही सातवेत तीव्र उमटले होते.
सातवे येथे स्मशानभूमीला लागून वैभव काशिनाथ घाटगे यांचे घर आहे ते अतिक्रमण करून बांधले आहे. या घरामुळे नवीन गावठाण यशवंतनगर येथील नागरिकांना अत्यंसंस्कार करण्याची गैरसोय होत असल्याने सदरचे अतिक्रमण काढावे यासाठी प्रभारी सरपंच उत्तम नंदूरकर यानी ग्रामस्थांसह पंचायत समिती समोर दि.२६ जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसले होते. यामुळे पंचायत समिती प्रशासनाने सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी आज सोमवार दि. २९ हा दिवस निश्चित केला होता.
सातवे यशवंतनगर मधील स्मशानभूमी अतिक्रमण केलेले गट नंबर १७१२अ ३ मधील अतिक्रमण धारक वैभव घाटगे यानी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतलेने कोणताही ताण तणाव अथवा अनुचीत प्रकार घडला नाही यावेळी पंचायत समिती ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे, पि.डी भोसले, वासुदेव कांबळे यासह परिसरातील १७ ग्रामसेवक व कर्मचारी तसेच
सातवे ग्रामपंचायत मधील कर्मचारी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला उपस्थित होते कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कोडोली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. घटनास्थळी सहा. पोलीस निरीक्षक कैलास कोडग यानी भेट देवून परस्थिती जाणून घेतली.
अतिक्रमण निर्मूलन मोहिम यशस्वी झाली पंचायत समिती प्रशासनाने वेळीच दक्षता घेतली असतीतर उपोषण करण्याची वेळ आली नसती तरीदेखील अतिक्रमण निर्मूलन व्हावे यासाठी पन्हाळा पंचायत समिती समोर उपोषणाला माझे सोबत बसलेले तसेच याठिकाणी भेट देवून पाठींबा देणारे तसेच सर्व ग्रामस्थानी माझेवर विश्वास व्यक्त करून गांव बंद ठेवून दिलेला मला पाठींबा तसेच हा प्रश्न प्रसार माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले पत्रकार या सर्वांचे मी आभार व्यक्त करून कार्यपूर्ती झाल्याने गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतल्याचे प्रभारी सरपंच उत्तम नंदूरकर यांनी सांगितले. यावेळी ग्रा.प. सदस्य माणिक पाटील, वारणा कारखान्याचे संचालक सुभाष कणसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण,महादेव पाटील, अशोक पोवार, सयाप्पा गोरड, अमर निकम, मोहन पाटील, विकास पाटील, बाबासो पोवार, अरुण वाळके यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
१) पन्हाळा येथे उत्तम नंदूरकर यानी अमरसिंह पाटील याच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले यावेळी माणिक पाटील,सुभाष कणसे,दत्तात्रय चव्हाण,महादेव पाटील,अशोक पोवार,सयाप्पा गोरड,अमर निकम,मोहन पाटील, विकास पाटील, बाबासो पोवार, अरुण वाळके यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
२) सातवे ता. पन्हाळा येथे केलेले अतिक्रमण जेसीबी च्या सहाय्याने जमीनदोस्त करताना