सतीश जारकीहोळी फौंडेशनकडून बैठे-फिरते विक्रेत्यांना छत्रींचे वाटप
12:52 PM Oct 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : काँग्रेसचे युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश जारकीहोळी फौंडेशनच्यावतीने शहरातील फिरते व बैठे विक्रेत्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन बसस्थानक आवारात याचे वितरण करण्यात आले. बैठे व फिरते विक्रेते ऊन असो वा पाऊस विनाआसरा आपला व्यवसाय करत असतात. याची दखल घेऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बैठे व फिरते विक्रेत्यांना आसरा मिळावा, यासाठी त्यांना छत्रींचे वाटप करण्यात येत आहे. बेळगावसह रायबाग, गोकाक, चिकोडी आदी तालुक्यातील विक्रेत्यांना जवळपास दोन हजार छत्रींचे वितरण करण्यात येत आहे.
Advertisement
Advertisement