हिंदवाडीतील सर्व्हिस रोडवर पेव्हर्स घातल्याने समाधान
बेळगाव : मनपाच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये येणारा हिंदवाडी क्रॉस क्र. तिसरा आणि सहावा या ठिकाणी सर्व्हिस रोडवर अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सर्व्हिस रोडची स्वच्छता करून त्यामध्ये पेव्हर्स घालण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांतून केली जात होती. याची दखल घेत नगरसेवक नितीन जाधव यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करत भंगीबोळात पेव्हर्स बसविले आहेत. त्यामुळे गेल्या 70 वर्षांपासूनची समस्या मार्गी लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. हिंदवाडी येथील तिसरा-सहाव्या क्रॉसवरील सर्व्हिस रोडवर गेल्या काही वर्षांपासून कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. गेल्या 70 वर्षांपासून ही समस्या कायम होती. मात्र, नगरसेवक नितीन जाधव यांनी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा करून अखेर पेव्हर्स बसविले असल्याने येथील गलिच्छ वातावरण दूर होण्यास मदत झाली आहे. यावेळी यल्लाप्पा अकणोजी, अमर अकणोजी, सागर कंग्राळकर, कुंदन दाणी, सुरेंद्र अणवेकर, रवी वरुटे, मदन सरदेसाई, बाळाप्पा बाळीकट्टी, विनायक लक्कन्नावर, प्रवीण महेंद्रकर, राजू सुणगार आदी उपस्थित होते.