नवी गल्ली सर्व्हिस रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे समाधान
बेळगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र. 27 मधील नवी गल्ली सर्व्हिस रस्त्याचे बुधवार दि. 29 रोजी काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यासाठी नगरसेवक रवी साळुंखे यांनी महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत रस्त्याचे काम पूर्णत्वास नेल्याने परिसरातील रहिवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. यापूर्वीच 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिनी घालून घरोघरी मिटर बसविण्यात आले आहेत. तसेच अलिकडेच गटारीचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. नगरसेवक रवी साळुंखे आपल्या प्रभागातील विविध समस्या मार्गी लावण्यासंदर्भात सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा करत असतात. सर्वसाधारण बैठकीमध्येदेखील आवाज उठवत असतात. नागरिकांच्या मागणीनुसार नवी गल्ली येथील सर्व्हिस रोडच्या काँक्रिटीकरणाला त्यांच्या हस्ते पूजन करून चालना देण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या. एकंदरीत प्रभागातील समस्या नगरसेवक रवी साळुंखे यांच्याकडून मार्गी लागत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.