For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदवाडीतील सर्व्हिस रोडवर पेव्हर्स बसविल्याने समाधान

10:36 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंदवाडीतील सर्व्हिस रोडवर पेव्हर्स बसविल्याने समाधान
Advertisement

बेळगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र. 29 मध्ये येणाऱ्या हिंदवाडी चौथा आणि पाचवा क्रॉस   येथील सर्व्हिस रोडवर अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे महानगरपालिकेने याकडे लक्ष घालून स्थानिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात होती. याची दखल घेत नगरसेवक नितीन जाधव यांनी पुढाकार घेत पेव्हर्स घातल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सदर सर्व्हिस रोडवर पेव्हर्स घालण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांतून अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यामुळे नगरसेवक नितीन जाधव यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करत पेव्हर्स बसविले आहेत. गेल्या 70 वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने रहिवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. पेव्हर्स बसविण्यात आल्याने कचऱ्याची समस्याही मार्गी लागण्यास मदत झाली आहे. यावेळी नागराज एच. व्ही., रविकुमार पुजारी, निखील बाचोळकर, ममता पुजारी, अपराती सुरुतेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.