For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Cultural Kolhapur: कोल्हापूरमध्ये पुजली जाणारी प्रसिद्ध लोकदेवता, साती आसरा

12:05 PM Jul 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
cultural kolhapur  कोल्हापूरमध्ये पुजली जाणारी प्रसिद्ध लोकदेवता  साती आसरा
Advertisement

सातजणी बहिणी म्हणून प्रख्यात या देवता म्हणजे तंत्र शास्त्रानुसार दिव्यांगना

Advertisement

By : प्रसन्न मालेकर 

कोल्हापूर : आषाढ आणि कार्तिक मासात साती आसरांची परडी सोडण्याचा सोहळा पंचगंगेवर उत्साहात होतो. विशेषत: सोमवार आणि गुरुवारी घाटावर परडी सोडायला आणि जेवायला असलेली गर्दीच या लोकदेवतेची लोकमान्यता दर्शवते. सातजणी बहिणी म्हणून प्रख्यात या देवता म्हणजे तंत्र शास्त्रानुसार दिव्यांगना.

Advertisement

अर्थात अप्सरांच्या उपासनेचा अपभ्रंश म्हणावा लागेल. 33कोटी देवतांपैकी एक कोटी म्हणजे प्रकारच्या देवता. सागर मंथनातून रंभा, मेनका, तिलोत्तमा, मंजूघोषा, सुकेशी, घृताची या सहाजणी प्रगटल्या. यांच्या रुपाचा गर्व घालवण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांच्या मांडीतून प्रगट केलेली उर्वशी अशा सात मुख्य अप्सरा.

या सगळ्या इंद्राच्या पर्यायानं स्वर्गाच्या सेविका. यांचं वैशिष्ट्या म्हणजे यांना देवांच्या भक्तांनी व्यक्त केलेल्या प्रापंचिक इच्छा पूर्ण करण्याच सामर्थ्य. पण दुर्गुण हा की यांची स्वभाव वैशिष्टे मात्र माणसाची. त्यामुळे त्या चटकन प्रसन्न होतात तशा रागावतातही. मनुष्याप्रमाणे देणं घेणं याची आवड. त्यांना जलविहार अतिशय प्रिय. म्हणूनच त्यांना ‘अपां सरती इति अप्सरा’ म्हणजे पाण्यात विहार करतात त्या अप्सरा.

त्याचंच बोलीभाषेतल रूप म्हणजे आसरा. या आसरांच्या बरोबरीने असतो तो झोटिंग. झोटींग भूतगणांचा प्रतिनिधी मानतात. आयुष्य भर पाण्यावर उपजीविका असणारा अतृप्त जीव मृत्यूनंतर झोटिंग होऊन जलप्रवाहांचा रक्षक होतो. साती आसरांच्या उपासनेत परडी सोडणे हा महत्त्वाचा विधी असतो. ही परडी म्हणजे बली, म्हणजे नैवेद्य अर्पण करण्याच्या पद्धतीचे एक अपभ्रंशात्मक रुप आहे.

ज्वारी किंवा मक्याच्या वाळलेल्या धाटांनी एक चौरस तराफा करतात. त्यावर नैवेद्य म्हणून 7 पुरणपोळी, काजळ, कुंकूहळद, पानं दक्षिणा, खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड, बदाम, बांगड्या, फणी करंडा मांडल्या जातात. प्रत्येक नैवेद्यावर कणकेचा दिवा, धामटी मुटका म्हणजे फळ, उदबत्तीचे झाड, खणानारळाची ओटी. तर एका पत्रावळीवर दहीभात, चिलिम, गुलाल, दिवा, विडादक्षिणा, उकडलेले अंडे असा नैवेद्य झोटिंगासाठी भरतात.

ही परडी देवावरुन आणि संबंधित व्यक्ती वरून ओवाळून नदी, तळं, विहीर अशा जलप्रवाहाजवळ नेऊन काठावर झोटिंगाची शेंदूर लावून बलीदान करून पाण्यात सोडतात. हा विधी वार्षिक किंवा तीन पाच वर्ष अशा ठराविक कालावधीनंतर करतात. हा विधी म्हणजे आसरांच देणं मानला जातो.

बलिदानाचे अन्न नदीवरच शिजवून खाऊन संपवायचे. परत आणायचे नाही. कारण झोटिंगाची वासना अन्नावर असते. त्या अभिलाषेने त्यांनी घरापर्यंत पोहोचू नये, ही भावना. आसरा जलदेवता असल्या तरी त्यांना मान अपमान प्रेम राग या भावना प्रबळ  असतात. त्या एखाद्या व्यक्तीला विशेषत: स्त्रीला माध्यम बनवून संचार करतात. त्या एका मर्यादेपर्यंत भूतभविष्य, अध्यात्मिक  अडचणींवर मार्ग सांगू शकतात अशी समजूत आहे.

प्रापंचिक अडचणी सोडवू शकतात पण त्या बदल्यात त्यांना प्रतिष्ठेची अपेक्षा असते. म्हणूनच त्यांची पूजा देवी म्हणून केली जाते. खरंतर जे विधी लिखित असते ते घडतेच. तरीही आपण देवाला आणि दैवालाही वेठीस धरतो. नवस, व्रतं करतो. आसरांची उपासनादेखील याच परंपरेतील आहे. साती आसरांबद्दल आदर असावा. पण भीत. किंवा अभिलाषेनं उपासना करू नका.

कर्ज काढून कुठलाही विधी करू नका. प्रेम आणि आदराने कुलाचार कुलधर्म थोडक्यात करावा हे उत्तम...दैवाला दोघांना ही वीस धरतो.निरनिरापका देवांना नवस वखतं वढरतो. आसरांली उपासना देखील काला परंपरेतील आहे. तेव्हा थोडवमकात इतवंढला म्हणेन. साती आसरांब्याल आदर असावा पण भीतीने विंढवा अभिलाषेनं त्कांली उपासना वढऋ नवढा .

जितवढी पूजा जमेल तितवढी वढरा वढर्ज वढाढून खर्ला वढऋन वढरावला लागते म्हणून वुढलाही विधी वढऋ नवढा . पखेम आणि आदराने जितवढा वुढलालार वुढलधर्म असेल तो थोडवमकात वढरावा हे उबाम...

Advertisement
Tags :

.