जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत साटेली माऊली भजन मंडळ प्रथम
न्हावेली / वार्ताहर
श्री देव ब्राम्हणदेव दत्तप्रसाद कला क्रिडा मंडळातर्फे मळेवाड भटवाडी येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत साटेलीचे श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक पिंगुळीच्या श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळाने तर ,मातोंड सावंतवाडचे श्री देव ईसवटी प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे - उकृष्ट पखवाज प्रथमेश राणे ( श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी ) उकृष्ट तबला अमन सातार्डेकर ( श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ,नेरुर ) उकृष्ट झांज अनिकेत पाटकर ( कलेश्वर पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ,वेत्ये ) उकृष्ट गायक सत्यनारायण कळंगुटकर ( श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ, साटेली ) उकृष्ट हार्मोनियम प्रसाद आमडोसकर ( श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ) उकृष्ट कोरस ( श्री साटम महाराज भजन मंडळ,निरवडे झरबाजार ) यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रंमाकांना ५००० रुपये,३००० रुपये २००० रुपये तर हार्मोनियम वादक,गायक, तबला वादक,पखवाज वादक, झांजवादक, कोरस प्रत्येकी ५०१ रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेत आठ भजन संघानी सहभाग घेतला होता.परिक्षक म्हणून दिंगबर गाड ( बांदा )व अमेय गावडे ( पाडलोस ) यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले.