For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साटेली महापुरुष वर्धापन दिन सोहळा 21 एप्रिलला

04:14 PM Apr 16, 2026 IST | अनुजा कुडतरकर
साटेली महापुरुष वर्धापन दिन सोहळा 21 एप्रिलला
Advertisement

सातार्डा -

Advertisement

साटेली - खालचीवाडी येथील श्री महापुरुष मंदिरचा दुसरा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. 21 एप्रिल रोजी होणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महापुरुष मंदिरामध्ये करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी 9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद होणार आहे.सायंकाळी 6 : 30 वाजता अमृताभिषेक साटेली निर्मित गायक सत्यनारायण कळंगुटकर, गायिका ममता प्रभू,तबला वादक अक्षय कांबळी,कुणाल आवळे, पखवाज वादक संकेत भगत,संवादिनी वादक गजानन मेस्त्री यांचा अभंग, नाट्यगीत,भक्तीगीतांचा ' स्वरसंध्या ' हा सुरेल कार्यक्रम सादर केला जाणार आहे.प्रसाद आडेलकर स्वरसंध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.ध्वनी संयोजन शेलेंद्र परब करणार आहेत.त्यानंतर रात्री 9 : 30 वाजता चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार मंडळाचा ' कालसर्प तांडव ' हा नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित रहाण्याचे आवाहन श्री देव महापुरुष कला क्रिडा मंडळ व खालचीवाडीतील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.