साटेली भेडशीत तिरंगा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद
पावसाची तमा न बाळगता शेकडोंच्या उपस्थितीत सैनिकांचे केले कौतुक
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
लष्करांना पाठिंबा देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी रविवारी साटेली- भेडशी येथील युवाशक्तीने पुढाकार घेऊन तिरंगा यात्रेचे नियोजन केले होते. या यात्रेत साटेली -भेडशीतील ग्रामस्थ,परिसरातील भारतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात युवावर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.आवाडे येथून सुरुवात करून साटेली भेडशी बाजारपेठ ते दामोदर मंदिर पर्यंत पुन्हा माघारी परतून ग्रामपंचायत कार्यालयाजवळीळ सभागृहात येत राष्ट्रगीत म्हणून तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली. या यात्रेत भारतीय झेंडे,भगवे झेंडे हातात घेत,घोषणा देत भारतीय सैनिकांनी केलेल्या सिंदुर ऑपरेशन या कारवाईचे अभिनंदन केले. व या तिरंगा यात्रेतून भारतीय लष्करांचे मनोबल वाढेल असा उपस्थितानी आशावाद व्यक्त केला.या यात्रेमध्ये सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्याबरोबर कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे, उपसरपंच सुमन डिंगणेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, सरपंच सेवा जिल्हा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस, वैभव इनामदार,महेश धर्णे,निलेश धर्णे,राहुल गवंडळकर,सिद्धेश कासार,संदेश मयेकर, ग्रामपंचायत सदस्य राजन सावंत,इस्माईल चांद,संपदा गवस,सेजल धर्णे,माजी सभापती दीपिका मयेकर चंद्रकांत मळीक, पराशर सावंत,शाम गोवेकर, गणपत डिंगणेकर,आदी ग्रामस्थ युवावर्ग महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या यात्रेत सहभागी झालेले सावंतवाडी संस्थांचे लखमराजे भोसले यांनी यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक केले तसेच या यात्रेला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर दीपक गवस ,चेतन चव्हाण, सरपंच छाया धरणे यांनीही या यात्रेला शुभेच्छा देत सिंदूर ऑपरेशन याबद्दल थोडक्यात आढावा घेतला. तसेच राष्ट्रगीत म्हणून तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला.त्याचबरोबर साटेली भेडशी वरचा बाजार येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर हिंदूंच्या रक्षणासाठी मदतकार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यालय कक्षाचे लखमराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.