कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ZP Election Matdarsangh 2025 : महाडिक-पाटील गटातच होणार हायहोल्टेज लढत

05:53 PM Jul 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच हाय होल्टेज लढत पहायला मिळणार

Advertisement

By : सुरेश पाटील

Advertisement

पुलाची शिरोली : पुलाची शिरोली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच हाय होल्टेज लढत पहावयास मिळणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील या दोन पारंपरिक गटातच सामना रंगणार आहे. या मतदार संघात पुलाची शिरोली आणि नागाव हे पंचायत समितीचे गण आहेत. याठिकाणी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी दिसतेय.

पुलाची शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीत पुलाची शिरोली, हालोंडी, नागाव, मौजे वडगाव, तासगाव, संभापूर, सोनार्ली वसाहत या गावांचा समावेश होता. आगामी निवडणुकीत प्रभाग रचनेत बदल होईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रभाग रचना बदलली तर पुलाची शिरोली जिल्हा परिषद मतदार संघात पुलाची शिरोली, नागाव व नव्याने टोप गावाचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील मतदारसंघातील उर्वरित गावांचा इतर मतदार संघात समावेश होण्याची शक्यता आहे.

पंचायत समिती गणात पुलाची शिरोली तर नागाव गणात नागाव आणि टोप या दोन गावांचा समावेश होण्याचा अंदाज आहे. मतदारसंघाचा अंदाज घेतला तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच थेट अटीतटीचा सामना रंगणार आहे. महायुतीकडून पुलाची शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघ भाजप (महाडिक) गटासाठी सुटणार हे निश्चित आहे.

या अंतर्गत येणारे दोन्ही पंचायत समिती गण आमदार डॉ. विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळू शकतात. जनसुराज्य पक्षाबरोबर तडजोड होऊन पुलाची शिरोली पंचायत गण भाजपला मिळू शकतो. दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांचा काँग्रेसचा पुलाची शिरोली जिल्हा परिषद मतदार संघावर प्रबळ दावा आहे. तर शिवसेना ठाकरे गटही दावा करू शकतो.

तसेच पंचायत समितीसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाटाघाटी होण्याची शक्यता आहेशिरोली जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यास महायुतीकडून भाजपतर्फे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे नक्की आहे. तसेच माजी पंचायत समिती सभापती डॉ. सोनाली पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे पुलाची शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, नागावचे माजी सरपंच आणि पंचायत समितीचे माजी सदस्य उत्तम सावंत, ठाकरे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

माजी पंचायत समिती सभापती सौ. सुचित्रा शशिकांत खवरे, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. रुपाली अनिल खवरे या दोन भावजयी निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोटेशननुसार आरक्षणाचा विचार केल्यास इतर मागासवर्गीय प्रवर्ग किंवा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव होऊ शकतो.

इतर मागासवर्गीय गटाचे आरक्षण पडले तर महायुतीकडून माजी उपसरपंच राजेश पाटील, अविनाश कोळी यांची नावे चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, अनिल खवरे यांची नावे चर्चेत आहेत.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला तर महायुतीकडून महाडिक गटाचे कट्टर समर्थक माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासो कांबळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे राज्य उपाध्यक्ष बाजीराव सातपुते मैदानात उतरु शकतात.

पंचायत समितीसाठी इच्छुकांची मोठी संख्या

पुलाची शिरोली पंचायत समितीसाठी संभाव्य उमेदवार : महायुती -कृष्णात करपे, अविनाश कोळी, डॉ.सुभाष पाटील. महाविकास आघाडी- शिवाजी पोवार-पाटील, अनिल खवरे, सरदार मुल्ला.

नागाव पंचायत समितीसाठी संभाव्य उमेदवार : महायुती- सौ.अश्विनी विजय पाटील, विजय निवास पाटील (महाडिक गट), उपसरपंच सुधीर सुभाष पाटील, श्रेयस नागावकर, डॉ. प्रदीप पाटील (जनसुराज्य शक्ती). महाविकास आघाडी- माजी सरपंच उत्तम गुंडा सावंत, काँग्रेस (सतेज पाटील गट), टोप विकास सोसायटीचे चेअरमन मुकुंद पाटील, टोपचे माजी उपसरपंच विजय पाटील (राजू बाबा आवळे गट)

Advertisement
Tags :
(BJP)# Congress MP#mahadevrao mahadik#Mahavikas Aghadi#satej patil#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaMahayutiPulachi ShiroliZP election 2025ZP Election Matdarsangh 2025
Next Article