For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'गोकुळ'ची; पेरणी जिल्हा बँकेसाठी; आमदार सतेज पाटील यांच्या भेटीगाठीमुळे वातावरण तापले

10:05 AM Sep 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
 गोकुळ ची  पेरणी जिल्हा बँकेसाठी  आमदार सतेज पाटील यांच्या भेटीगाठीमुळे वातावरण तापले
Advertisement

कोल्हापूर : 'गोकुळ'ची मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे, पण तरीही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अशा वातावरणात गोकुळ निवडणुकीच्या दृष्टीने नेत्यांकडून जोडणी सुरू आहे, रविवारी (दि. ६) आमदार सतेज पाटील यांनी कागल तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांच्या नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. कोल्हापुरात माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांची रूईकर कॉलनीतील निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. तसेच शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांची नागाळा पार्क येथील घरी भेट घेतली. दुपारी कागलमधील तर सायंकाळी मुरगूडमधील नेते, पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन सतेज पाटील यांनी चर्चा केली. या भेटी गोकुळसाठी आहेत, की त्यातून जिल्हा बँकेसाठी पेरणी सुरू आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

Advertisement

जिल्हा सहकारी दूध संघ, गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया मतदारयादीने सुरू झाली आहे. ही निवडणूक महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशीच होणार, हे यापूर्वीही महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी (दि.५) दसरा चौकातील युवाशक्तीच्या दहीहंडीवेळीही खासदार धनंजय महाडिक यांनी निवडणूक
महायुती आणि मविआतच होईल. गोकुळची हंडी महायुतीच फोडेल, हे स्पष्ट केले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही हीच भूमिका घेतली आहे. तरीही ज्याच्याकडे ठराव जास्त तोच जिंकणार, हे या निवडणुकीच्या विजयाचे समीकरण आहे. त्यामुळे नेत्यांकडून ठरावधारकांच्या भेटींना गती आली आहे.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वी चंदगड तालुक्यात आमदार शिवाजी पाटील यांची तर शिरोळ तालुक्यात भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन धक्का दिला होता. कोल्हापुरात माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांची भेट घेतली. त्याअगोदर शाहू ग्रुपचे नेते समरजितसिंह घाटगे यांची नागाळा पार्क येथील घरी भेट घेतली. या दोन्ही भेटीतील चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

Advertisement

कागल तालुक्यातत्यांनी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची भेट घेतली. मुरगूडमध्ये बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील, गोकुळचे माजी चेअरमन रणजित गोकुळचे म पाटील यांची भेट घेतली. कागलमध्ये श्रीनाथ समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी, काँग्रेसचे चंद्रगुप्त प्रभावळकर यांची भेट घेतली. आमदार सतेज पाटील यांनी रविवारी कागल तालुक्यातील विविध पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. काही ठिकाणी त्यांनी बंद दाराआड संबंधितांसमवेत चर्चा केली. कागल तालुक्यातील नेते, पदाधिकाऱ्यांच्या दिवसभरात पाटील यांनी घेतलेल्या भेटीगाठी, त्यात झालेली चर्चा सद्यस्थितीत गुलदस्त्यात आहे. पण या भेटी गोकुळसाठी असल्या त्यातून जिल्ला पेरणी, बँकेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे का, याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Advertisement
Tags :

.