महायुतीचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठीच मराठी माणूस एकत्र, Satej Patil यांनी स्पष्टच केलं
मराठी माणसाचं किंवा राज्याचं हित जपणं आवश्यक आहे.
कोल्हापूर : मराठी भाषा, मराठी स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी आणि महायुतीचं षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मराठी माणूस एकत्र येत असेल तर चांगलं आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्याशी कॉल झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर घडामोडी घडल्या आणि एकत्रित मोर्चाचे नियोजन झाले आहे. आज कोल्हापुरात ते माध्यमांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, मराठी माणसाचं किंवा राज्याचं हित जपणं आवश्यक आहे. ठाकरे बंधूंबाबत संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. दोघे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे याची सुरुवात या मोर्चाच्या निमित्ताने होईल असे महाराष्ट्राला वाटते आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे मी त्यावर बोलणे योग्य नाही. सेना आणि मनसेबद्दल संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.
शक्तीपीठ महार्गासंदर्भात ते म्हणाले, गरज नसेलेला शक्तीपीठी सरकारने करु नये अशी आमची भावना आहे. एक जुलै रोजी राज्याच्या 12 जिल्ह्यातील शेतकरी याविरोधात चक्काजाम करणार आहेत. किमान आता तरी शक्तीपीठ महामार्गाबद्दल शेतकऱ्यांची भूमिका सरकारने समजून घ्यावी.
आम्ही सर्वजण दोन दिवसांत शरद पवारची भेट घेणार आहे आणि हा महामार्ग गरजेचा कसा नाही हे पटवून देणार नाही. शक्तिपीठ हा राज्याचा महामार्ग असल्यामुळे त्याला संकेश्वरमधून घेऊन जाणे चुकीच आहे. कारण कर्नाटकमध्ये जायचे असेल तर कर्नाटक सरकारची परवानगी घ्यावी लागेल. हा प्रकल्प केंद्राचा नाही तर राज्याचा आहे.