For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते Satej Patil यांना करा, Congress शिष्टमंडळाची मागणी

12:17 PM Sep 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते satej patil यांना करा  congress शिष्टमंडळाची मागणी
Advertisement

विरोधी पक्षनेता पद मिळावे यासाठी काँग्रेस आग्रही आहे

Advertisement

कोल्हापूर : विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांची मुदत 30 ऑगस्टला संपली आहे. या जागी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची नेमणूक व्हावी, हे पद काँग्रेसलाच मिळायला पाहिजे अशी आग्रही भूमिका काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून मांडली.

मुंबईत मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात आणि विजय वड्डेटिवार यांचा प्रामुख्याने समावेश होता. मुंबईत मनसे सोबत शिवसेनेची संभाव्य युतीसह विधानसभा विरोधी पक्षनेता पदासाठी या बैठकीत चर्चा झाली.

Advertisement

विरोधी पक्षनेता पद मिळावे यासाठी काँग्रेस आग्रही आहे. 78 सदस्य संख्या असलेल्या विधानपरिषदेत महायुतीचे 40 सदस्य आहेत. विरोधी महाविकास आघाडीचे 16 सदस्य असून 22 जागा रिक्त आहेत. यामध्ये काँग्रेसचे सात तर शिवसेनेचे सहा सदस्य आहेत. अंबादास दानवे यांची एक जागा आता रिक्त झाली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत ऑगस्टमध्ये संपली. आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसमधील पक्षांतर्गत ताकद, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता, विधानपरिषदचे विरोधपक्ष नेता पदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.

या राजकीय घडामोडीचा सतेज पाटील यांच्या राजकीय वाटचालीची आणि जिह्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी होऊ शकते. दरम्यान होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील राजकारणाचा महत्वाचा टप्पा ठरतील. महाविकास आघाडीची विरोधाची धार वाढेल सतेज पाटील यांना विरोधीपक्ष नेतापदी निवड झाल्यास याचा मोठा लाभ काँग्रेससह महाविकास आघाडीला होणार आहे.

शक्तिपीठ विरोधात आंदोलनाची राळ उठवून राज्यातील अकरा जिह्यात महायुती सरकारला सतेज पाटील यांनी जेरीस आणले आहे. विरोधी पक्षनेतापदी नियुक्ती झाल्यानंतर महाविकास आघाडीची विरोधाची धार अजून टोकदार होईल. पश्चिम महाराष्ट्रात तगडे नेटवर्क असल्याने सतेज पाटील यांच्या निवडीनंतर सरकारविरोधात जनाधार तयार करण्यास होणार आहेसतेज पाटील यांची निवड झाल्यास याचा कोल्हापूर जिह्यातील राजकाणावर मोठा परिणाम होईल.

विधान परिषद सदस्य संख्या : 78 सदस्य (सद्यस्थिती)

  • महायुती युती : 40 सदस्य
  • भारतीय जनता पार्टी : 22 सदस्य
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 8 सदस्य
  • शिवसेना (शिंदेगट) : 7 सदस्य
  • इतर : 3 सदस्य
  • विरोधीपक्ष महाविकास आघाडी : 16 सदस्य
  • काँग्रेस : 7 सदस्य
  • शिवसेना उबाठा : 6 सदस्य
  • शरद पवार गट (राष्ट्रवादी) : 2 सदस्य
  • इतर : 1 सदस्य
  • रिक्त जागा : 22 सदस्य
Advertisement
Tags :

.