सातारचा दसरा दिमाखदार करणार
सातारा :
ऐतिहासिक सातारचा यंदाचा विजयादशमी आणि सिमोल्लंघन सोहळा खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत नेत्रदिपक व अधिक दिमाखदार पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकित घेतला.
श्रीमंत उदयनराजे भोसले मित्रमंडळ, रक्षक प्रतिष्ठान, राजे प्रतिष्ठान, शिवप्रेमी, श्रीमंत छत्रपती उदयनराजे समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सातारच्या विश्रामग हामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेण्यात आले. सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन एकविचाराने यंदाचा शाही सिमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले याच्या उपस्थितीत पार पाडला जाईल. लवकरच या सोहळ्याचे पूर्ण नियोजन आणि रुपरेखा लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर यांनी दिली.
सातारा ही तत्कालीन मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशजांकडून विजया दशमीच्या दिवशी विजयादशमी आणि सिमाल्लंघनचा सोहळा मोठ्या दिमाखात आणि परंपरेने चालत आल्याप्रमाणे तितक्याच तोलामोलाने साजरा होत असतो. हा सिमोल्लंघन सोहळा राज्य शासनामार्फत साजरा होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. राज्यशासन भारतीय संरकृतीच्या प्रथा आणि परंपरांचा नेहमीच सन्मान करीत आले आहे. राज्य शासनाने यंदापासून श्री गणेशात्सव राज्य महोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय आणि कोल्हापूरचा शाही दसरा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्ण्य निश्चितच स्वागतार्ह आहे.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक काका धुमाळ, रक्षक प्रतिष्ठानचे सुशीलदादा मोझर, माजी जि. प. सदस्य बाळसाहेब गोसावी, समृद्धी जाधव, ढाणे बापू चंद्रकांत भोसले, पं. स. माजी सभापती संजय पाटील, बबन देवरे, हेमंत सावंत, बाबासाहेब घोरपडे, दिशा समितीचे सदस्य अॅड. विनित पाटील, विजयसिंह नायकवडी, माजी नगराध्यक्षा सौ. रंजना रावत, गितांजली कदम, अश्विनी पूजारी, सुवर्णाताई पाटील, वैशाली टंकसाळे, अमोल तांगडे, सतीश माने, माजी नगरसेवक संजय शिंदे, अशोक शेडगे, कल्याण राक्षे, इर्शाद बागवान, राम हादगे, बाळासाहेब ढेकणे, विजय चौगुले, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, शंकर माळवदे, राजु भोसले, लक्ष्मण कडव, प्रविण धस्के, अॅड. विकास पवार, भाजयुवामोर्चा उपाध्यक्ष संग्राम बर्गे, गणेश जाधव, चिन्मय कुलकर्णी, अशोक घोरपडे, मिलींद चिपळूणकर उपस्थित होते.