अॅथलेटिक्समध्ये सातारा, सोलापूरचे वर्चस्व
कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा : कोल्हापूरचा पुण्यावर 6-1 फरकाने शानदार विजय
कोल्हापूर :
शहरातील कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर सुवर्ण महोत्सवी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस क्रीडा स्पर्धेला शुक्रवार पासून सुऊवात झाली आहे. स्पर्धेच्या शनिवार या दुसरा दिवशी वैयक्तिक खेळांचे आणि सांघिक खेळांच्या साखळी सामने झाले.
या खेळाचा निकाल असे 10 हजार मी - सुवर्ण पदक हरीदास देशमुख (सोलापूर शहर), रजत पदक हरीदास देशमुख (कोल्हापूर), कांस्य पदक विशाल अहीरे (सातारा) 800 मिटर धावणे (पुऊष) - सुवर्ण पदक राजू रामा चव्हाण (सोलापूर शहर), रजत पदक वजाहत अली झाकीर हुसेन शेख (सोलापूर शहर), कांस्य पदक किसन सुरेश साबळे (सांगली) 800 मिटर धावणे (महिला) - सुवर्ण पदक सोनाली धोंडीराम देसाई (कोल्हापूर), रजत पदक-संगीता मालू मंत्रे (सोलापूर शहर), कांस्य पदक सुनिता हणमंत मुरकुटे (सोलापूर शहर) थाळी फेक (पुऊष) - सुर्वण पदक संतोष जगत्राथ जाधव (सांगली), रजत पदक स्वप्नील सुरेश पाटील (सातारा), कांस्य पदक इंदल रंजन राठोड (सांगली) थाळी फेक (महिला) - सुवर्ण पदक ऋतुजा बाळासो चिमगांवे (सातारा), रजत पदक माधवी हनमंत यादव (सातारा), कांस्य पदक ज्योती उत्तम लोटे (सांगली) लांब उडी (पुऊष) - सुवर्ण पदक ऋषीकेश प्रकाश पाटील (कोल्हापूर), रजत पदक अतुल सुभाष शिंदे (सोलापूर ग्रामीण), कांस्य पदक प्रताप आबासो कोरे (सोलापूर शहर) लांब उडी (महिला) - सुर्वण पदक स्नेहा शिवराम कोरे (सातारा), रजत पदक आरती विनायक फाळके (सातारा), कांस्य पदक पूजा बाबू गोते (सोलापूर शहर) 110 मीटर अडथळा (पुऊष) - सुर्वण पदक अमृत तानाजी तिवले (कोल्हापूर), रजत पदक विशाल सरदार माळवी (कोल्हापूर), कांस्य पदक गणेश काशिनाथ क्षीरसागर (सोलापूर ग्रामीण) 110 मीटर अडथळा (महिला) सुर्वण पदक वैष्णवी दिपक शिंदे (सातारा), रजत पदक माशाबी खाजासाब शेख (सोलापूर ग्रामीण), कांस्य पदक लता दुलाजी वागडव (सातारा) हातोडा फेक (पुऊष) - सुर्वण पदक संतोष जगनाथ जाधव (सांगली), रजत पदक अमित मोहन साळुंखे (सातारा), कांस्य पदक वैभव साळुंखे (सांगली)
हॉकीत कोल्हापूरचा विजय
हॉकीमध्ये कोल्हापूर विरुध्द पुणे 06-01 अशा गुणांसह कोल्हापूर संघ विजयी, सातारा विरुध्द सांगली - 02-02 नुसार सामना बरोबरीत. तर फुटबॉलमध्ये पुणे ग्रामीण विरुध्द सातारा 0 5 ने विजयी.