For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime | सातारा हादरले! किरकोळ वादातून आरफळमध्ये थरार; डोक्यात खोऱ्याने वार करून एकाची हत्या

03:11 PM Apr 14, 2026 IST | NEETA POTDAR
satara crime   सातारा हादरले  किरकोळ वादातून आरफळमध्ये थरार  डोक्यात खोऱ्याने वार करून एकाची हत्या
Advertisement

                   आरफळ गाव खून प्रकरणाचा अवघ्या ४ तासांत उलगडा

Advertisement

सातारा -सातारा तालुक्यातील आरफळ गावच्या हद्दीत घडलेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावत आरोपीला जेरबंद केले. या प्रकरणातील आरोपी ऋषिकांत कासकर याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही घटना दि. १२ एप्रिल रोजी गावंधर शिवारात घडली. गावातील काही मुलांनी पेट्रोल काढतानाचा व्हीडिओ व्हायरल करू नये, तसेच मुलांना विनाकारण बदनाम करू नये, असे फिर्यादीच्या पतीने आरोपीस सांगितले होते.

याच कारणावरून आरोपीने मनात राग धरत डोक्यातखोऱ्याने वार करून त्यांचा खून केला. घटनेनंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी विशेष पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. डी. बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शिवथर येथून संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, मोबाईल व दुचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश तांबे करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.