For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | सातारा आरटीओचा महसूल वसुलीत धडाका; एका वर्षात तब्बल २०८ कोटींचा टप्पा पार!

05:11 PM Apr 22, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा आरटीओचा महसूल वसुलीत धडाका  एका वर्षात तब्बल २०८ कोटींचा टप्पा पार
Advertisement

                       सातारा RTOचा महसूल वसुलीत मोठा विक्रम

Advertisement

गोडोली -सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच कराड, फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी विविध योजनांच्या माध्यमातून उत्पन्न बाढीचा धडाका सुरु ठेवला असून महसूल बाढीत अब्बल कामगिरी केली आहे. नवीन वाहन नोंदणी, आकर्षक क्रमांक, परवाना शुल्क, दंडात्मक कारवाई आदी विविध माध्यमांतून महसूलाचीवसुली करण्यात आली. २०२५-२६ या आर्थिक वर्षात सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०८ कोटी ६९ लाख, कराड उपप्रादेशिक कार्यालयाने ८० कोटी ९६ लाख, तर फलटण कार्यालयाने ४१ कोटी ७६ लाख महसूल जमा केला. या कामगिरीमुळे परिवहन विभागाने महसूल वसुलीमध्ये आपले उद्दिष्ट जवळपास पूर्ण केले असून शासनाच्या उत्पन्नात भरीव योगदान दिले आहे.

आकर्षक क्रमांकाची क्रेझ
सध्या आकर्षक वाहन क्रमांक घेण्याची नागरिकांमध्ये वाढती क्रेझ दिसून येत आहे. यासाठी ऑनलाईन नंबरसाठी जादाची फी भरुन नोंदणी केली जाते. एकाच नंबरची दोन आणि अधिक वाहनधारकांनी मागणी केल्यास जावा रक्कम देणाऱ्यांना नंबर दिला जातो. यामुळे आकर्षक वाहन क्रमांकासाठी तब्बल ८६६४ वाहनांच्या विशेष क्रमांक नोंदणीमधून १० कोटी १६ लाख ३५ हजारांचा महसूल कमाई झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.