For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Pocso Case साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गुन्हा दाखल

03:49 PM Jun 16, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara pocso case साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गुन्हा दाखल
Advertisement

सातारा : शहर परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका युवकाविरोधात बळजबरी अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती दि. १३ रोजी दुपारी तीनच्या सुमारास घरी एकटी असताना तिच्या घराशेजारी राहणाऱ्या आरोपीने तिला तुझ्याकडे काम आहे, आमच्या घरी ये, असे सांगून घरी बोलावले. त्यानंतर आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

तसेच, घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही माहिती दिल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी युवतीला देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी १७ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून अर्जुन भगवान पवार (वय २१) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.