Satara : पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची १३ ग्रामपंचायतीवर सत्ता
सातारा प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीच्या निकालात आठ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. मल्हारपेठ , मुंद्रुळकोळे, कुसरुंड , बेलवडे खुर्द, गावडेवाडी, जिंती ग्रामपंचायतींमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने सत्तांतर घडवले. तर रुवले ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी आणि गाढखोपमध्ये महाविकास आघाडीने मंत्री देसाईंच्या गटाच्या पॅनेलचा पराभव केला.
आठ ग्रामपंचायतींची मंत्री देसाई यांनी तर दोन ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आणि मुंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीत काँग्रेसने सत्ता अबाधित राखली. संपूर्ण पाटण Patan तालुक्याचे लक्ष लागलेल्या मल्हारपेठ व मुंद्रुळकोळे या मोठ्या ग्रामपंचायतींच्या लढती अटीतटीच्या होत्या. मल्हारपेठ ग्रामपंचायतीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच आघाडीची सत्ता होती. मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai व त्यांच्या समर्थकांनी प्रतिष्ठापणाला लावून सरपंच पदासह बहुमत घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम व राष्ट्रवादीच्या नेत्यांना धुळ चारली. ढेबेवाडी विभागावर वर्चस्व असलेल्या व मात्तबर नेतेमंडळी असलेल्या मुंद्रुळकोळे ग्रामपंचायतीची राष्ट्रीय काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे असलेली सत्ता देसाई गटाने सत्तांतर घडवून ताब्यात घेतली. बेलवडे खुर्दमध्ये मंत्री देसाई गटात बंडखोरी झाली असताना आणि मनसेने वेगळे पॅनेल उभे केले असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे पानीपत केले.