For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : पंचायत समितीच्या सभेत अधिकारी धारेवर 

06:12 PM Jun 07, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   पंचायत समितीच्या सभेत अधिकारी धारेवर 
Advertisement
                            पाठबंधारे अधिकाऱ्यांनी सातारा तालुक्याचा प्राधान्याने विचार करण्याची सदस्यांची मागणी
Advertisement

सातारा : पंचायत समिती गणातील जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात सदस्य पोटतिडकीने भांडत असतात. मुद्दा मांडत असतात. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी हे जाणीवपूर्वक सभेला येत नाहीत. आले तर कोणाला तरी पाठवून देतात, निर्णय घेणारे अधिकारी येत नाहीत, अशा शब्दात अधिकाऱ्यांना पंचायत समिती सदस्यांनी धारेवर धरले.

दरम्यान, सातारा तालुक्यात मोठी धरणे आहेत, त्या धरणांच्या पाण्यावर तालुक्यातील गावांचा हक्क आहे, पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी विचार करावा, अशीही चर्चा सभेत झाली. पंचायत समितीची मासिक सभा स्व. अभयसिंह महाराज सभागृहात सभापती महेश गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती सुषमा जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक अधिकारी सदस्यांच्या फोनला प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. काही अधिकाऱ्यांना सदस्यांच्या फोनचीच अलर्जीअसल्याचा आरोपही सभेत करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, कृषी विभाग, एसटी महामंडळ, ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान आणि समाजकल्याण विभागांच्या कामकाजावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 
ग्रामीण भागातील वीजपुरवठा, नवीन वीज जोडण्या, वीज खांब बदलणे, सौरऊर्जा योजनांची अंमलबजावणी, रस्ते विकास कामे तसेच कृषी योजनांच्या लाभाबाबत सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. एसटीच्या ग्रामीण वाहतूक सेवांबाबतही सदस्यांनी समस्या मांडत उपाययोजनांची मागणी केली. 
दरम्यान, पंचायत समितीच्या सभेला अनुपस्थित राहिलेल्या विभागीय अधिकाऱ्यांबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विनाकारण गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आणि विकासकामांच्या संबंधित आढाव्यासाठी अधिकाऱ्यांनी सभेला उपस्थित राहणे, ही त्यांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारी व सूचनांची संबंधित विभागांनी गांभीर्याने दखल घ्यावी तसेच अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात अधिक समन्वय राहण्याची गरज असल्याचे मत सभेत व्यक्त करण्यात आले. ग्रामीण भागातील विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. 
दरम्यान, सातारा तालुक्यात उरमोडी, कण्हेरही मोठी धरणे आंहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवसत आहेत. या दिवसांत शेतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. धरणाचे पाणी पहिले सातारा तालुक्यातील गावांना मिळाले पाहिजे. पाटबंधारे विभागाने याचा विचार करावा, असाही ठराव करण्यात आला.
Advertisement
Tags :

.