Satara Kas Pathar: कास पठारावर हंगामाचा शुभारंभ, सात दिवसांत फुलणार फुलांची चादर
ऑनलाईन बुकींग सुरु, यंदा सजवलेल्या बैलगाडीचा वापर
साताराः जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारच्या हंगामाचा गुरुवारी शुभारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी ४६१ पर्यटकांनी आनंद लुटला, दुसन्या दिवशी शुक्रवारी सुट्टी असल्याने हजारो पर्यटकांनी हजेरी लावून येथील निसर्गसौंदर्यासह रंग फुलांचा मुनमुराद आनंद लुटला.
कास पठाराच्या यावर्षीच्या हंगामाचा प्रारंभ उपपनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी हंगामाविषयी अधिक माहिती देताना उपवनसंरक्षक सातपुते यांनी सांगितले, सजवलेल्या बैलगाड्या आणि इलेक्ट्रिक वाहने यांचा वापर करणार आहोत तसेच नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृह आदीची सोय केली आहे.
सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन बुकिंग राहणार असून गैरसोय टाळण्यासाठी पर्यटकांनी आगाऊ बुकिंग करूनच घ्यावे, असे आवाहन केले आहे. एका दिवसासाठी कास पठारावर ३ हजार लोकांनाच प्रवेश मिळणार असून त्यांना दिलेल्या वेळेनुसार सकाळी ७ ते ११, ११ ते २, आणि २ ते ६ या तीन टप्यात पर्यटक सोडले जातील. सुरक्षितेच्या दृष्टीने हुल्लहबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
येत्या सात आठ दिवसांत सर्वत्र फुलांची चादर
सततच्या पावसामुळे फुले उमलण्यास उशीर झाला असला तरी गुलाबी रंगाचा तेरडा चांगला रंग भरू लागला असुन गेंद, यवर, नाल, सोनकी, सितेची अस्य, नीतिमा आदी विविध जातीप्रजातींच्या फुलांची उधळण होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या सात आठ दिवसांत सर्वत्र फुलांची चादर पहायला मिळण्याची नैसर्गिक स्थिती निर्माण आली आहे.
-संतोष आटाळे, वनसमिती अध्यक्ष
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रावळ, वनक्षेत्रपाल संदीप जोषळे, वनरक्षक समाधान वाघमोडे, कास कार्यकारी समितीचे अध्यक्ष संतोष आटाने, उपाध्यक्ष विजय केंदे, समिती सदस्य प्रदीप कदम, ज्ञानेश्वर आखाहे, विमल लिंगरे, पांडुरंग शेलार, दत्ता किर्यंत, विठ्ठल कदम, तानाजी आटाळे, वत्ता बावापुरे, सिताराम बादापुरे, विष्णु किर्यंत, वर्षा बादापुरे, कांचन किर्दत, विकास किर्यंत, सोमनाथ बुढळे आदी उपस्थित होते.