महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घाटाई मंदीरात चोरट्यांचा डल्ला ! दानपेटीतील रकमेसह साहीत्य चोरीला; चोर सीसीटिव्हीत कैद

10:39 AM Mar 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
Satara Ghatai Temple Theft
Advertisement

कास वार्ताहर

परळी खोऱ्याचं आराध्य दैवत लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या घाटवण ता. सातारा येथील घाटाई देवीच्या मंदिरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी दान पेटीतील रक्कमेसह देवीच्या घंटा समई ताटे हॅलोजन लाईट आदी हाजारोच्या साहीत्याची चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

सातारा घाटाई कास रोडवरील घनदाट देवराईत देवीचे एकमेव मंदीर असुन नेहमी प्रमाणे देवस्थान चे पुजारी सोमनाथ भगत सोमवारी सायंकाळी सहा वाजतासाहीत्य जैसे थे ठेऊन घरी परतले व मंगळवारी सकाळी आठ वाजता पुन्हा ते देवीची पुजा करण्यासाठी मंदीरात आले असता त्यांना मंदीरातील साहीत्य विस्कटलेले दिसले दानपेटी फोडुन त्यातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली असुन देवीच्या गाभार्‍यातील घंटा समई ताटे हॅलोजन लाईट आदी हाजारोंचे साहीत्य घेऊन चोरटे पसार झाल्याचे त्यांचा निर्दशनास आले असता त्यांनी हि घटना देवस्थान ट्रस्टचे पदाधीकारी सचिव सोमनाथ जाधव विश्वस्त जयराम काळे दिनकर भगत पोलिस पाटील अक्षय काळे यांना कळवीताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर घटनेची पाहणी करून सातारा तालुका पोलिस ठाण्यात माहीती कळवीली असता पोलिस दुपारी पोलिस उपविभागीय अधिकारी नवले साहेब तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे साहेब यांनी घटना स्थळी भेट देऊन घटनेचा सविस्तर माहिती घेतली असुन घटनेसंबधी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस हावलदार संदीप कर्णे पुढील तपास करणार आहेत.

Advertisement

चोरटे मंदीरातील सिसीटीव्हीत कैद झाले मारुती कार मधुन आलेल्या एक युवक व युवती यांनी चोरी केल्याचे सिसीटिव्हत दिसत आहे

Advertisement
Tags :
charity box Thief CCTVSatara Ghatai TempleTheft money
Next Article