For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | सातारा जिल्ह्याला राज्यात अग्रक्रमावर नेणार; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही

05:08 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा जिल्ह्याला राज्यात अग्रक्रमावर नेणार  पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही
Advertisement

                            साताऱ्यातील गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान;

Advertisement

सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. बाळासाहेब देसाई यांनी राज्याच्या प्रगतीची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सातारा जिल्ह्याला राज्यात अग्रक्रमावर नेण्याचा निर्धार आम्ही केला आहे, अशी ठाम भूमिका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्यास्थापना दिनानिमित्त श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलयेथे पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. साताऱ्यात या डिजिटल मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाला. 'कोयना दौलत' या निवासस्थानावरून त्यांनी स्वतः 'स्व-गणना करत या उपक्रमाची सुरुवात केली आणि जिल्हावासियांना या प्रक्रियेत सक्रिय सहभागाचे आवाहन केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, सीईओ याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील उपस्थित होते.

Advertisement

अधीक्षक अभियंता संतोषरोकडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, निवासीउपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे नितीन तळपे आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद दंडगव्हाळ यांना पुरस्कार देण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार वैशाली चोरमले व सुचित्रा घोगरे-काटकर यांना प्रदान करण्यात आला.

जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२६ अंतर्गत आर्या देवेंद्र बारटक्के (महिला बॉक्सिंग), कुशल कुमार मोहिते (पुरुष मैदानी), वेदांत साळुंखे (दिव्यांग मैदानी) आणि विनोद कदम (मार्गदर्शक स्केटिंग) यांचा गौरव करण्यात आला. तसेच आदर्श ग्राम महसूल अधिकारी म्हणून रावू सतीश मुंगळे यांना सन्मानित केले.

Advertisement
Tags :

.