साटम महाराजांचा ८८ वा पुण्यतिथी सोहळा १६ मार्चला
ओटवणे । प्रतिनिधी
कोकणातील संताचे संत शिरोमणी असलेले दाणोली येथील साटम महाराजांचा ८८ वा पुण्यतिथी सोहळा रविवार १६ मार्च रोजी होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर बेळगाव परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ४ वाजता काकड आरती, सकाळी ४:३० वाजता अभ्यंगस्नान, सकाळी ६:३० वाजता बाळू राऊळ बुवा (सांगेली) व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, सकाळी ७:३० वाजता श्री बोभाटे बुवा (झाराप) व सहकारी यांचे सुश्राव्य कीर्तन, सकाळी ८ वाजता सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्याहस्ते साटम महाराज समाधी पूजन व विधिवत पाद्यपूजा त्यानंतर सकाळी ८:३० वाजता श्री घाटकर (कोलगाव) यांचे बासरी वादन, सकाळी ९:३० वाजता बुवा संदेश सामंत (झाराप) व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, सकाळी १०:३० वाजता बुवा अंकुश सांगेलकर (सांगेली) व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, सकाळी ११:३० वाजता श्री दळवी बुवा व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, दुपारी १२:३० वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसाद, दुपारी १ वाजता राधाकृष्ण संगीत साधनाच्या संचालिका सौ विणाताई दळवी व सहकारी यांचा अभंग व भक्तीगीतांचा सुरेख नजराणा, दुपारी २:३० वाजता सावंतवाडी येथील निलेश मेस्त्री व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ४ वाजता पुणे येथील ह भ प नातू व त्यांचे सहकारी यांचे सुश्राव्य किर्तन,सायंकाळी ७ वाजता महाआरती, सायंकाळी ७: ३० वाजता साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने दाणोली पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा श्रीमंत खेम सावंत भोसले यांच्याहस्ते सत्कार, रात्री ८ वाजता दाणोली हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ९ वाजता श्री समर्थ साटम महाराजांच्या सवाद्य पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार असून त्यानंतर मध्यरात्री २ वाजता सुधाकर दळवी प्रस्तुत चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार मंडळाचा (कवठी) यांचा 'पाप गेले पुण्या पाशी' हा ट्रिक्ससियुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी संस्थांचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेम सावंतभोसले आणि विश्वस्त युवराज लखम सावंतभोसले यांनी केले आहे.