निरवडेत ५ पासून साटम महाराज पुण्यतिथी उत्सव
न्हावेली /वार्ताहर
निरवडे येथील साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळाच्या वतीने गुरुवार ५ मार्च पासून तुकाराम बीज तिथी साटम महाराज यांची ८९ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ५ मार्च रोजी सकाळी ७ ते ९ वाजता लघुरुद्र व मूर्तीपूजन,पादुका पूजन आणि अभिषेक दुपारी १२ वाजता आरती दुपारी १२.३० वाजता तीर्थप्रसाद दुपारी १.३० वाजता महाप्रसाद सायंकाळी ५ वाजता हरिपाठ ( महिला मंडळ,निरवडे झरबाजार ) सायंकाळी ६ वाजता सुश्राव्य भजन ( बुवा - उदय नागडे तळवडे ) रात्री ७ वाजता आरती रात्री ८ वाजता वारकरी भजन ग्रुप,पेंडूर मातोंड रात्री ९ वाजता साटम महाराज भजन मंडळ निरवडे शुक्रवार ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती ( महिला मंडळ,निरवडे झरबाजार ) सायंकाळी ७ वाजता आरती,सायंकाळी ८ वाजता भजनाचा कार्यक्रम व आरती रात्री ९ वाजता बुवा पुरुषोत्तम परब वडखोल यांचे भजन रात्री १० वाजता श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ,पावशी कुडाळ यांचा नाट्यप्रयोग शनिवार ७ मार्च सायंकाळी ४ वाजता महिला व मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता हरिपाठ व आरती ( महिला मंडळ,निरवडे झरबाजार ) रात्री ८ वाजता लिलाव रात्री ९ वाजता पारंपारीक वालावलकर दशावतार नाट्य मंडळ,ओसरगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ गेण्याचे आवाहन साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळ,निरवडे यांनी केले आहे .