निरवडेत १६ पासून साटम महाराज पुण्यतिथी उत्सव
विविध धार्मिक कार्यक्रम
न्हावेली / वार्ताहर
निरवडे येथील साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळाच्या वतीने रविवार १६ १७ १८ मार्च रोजी तुकाराम बीज तिथी साटम महाराज यांची ८८ व्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १६ रोजी सकाळी ८ वाजता मूर्तीपूजन व पादुका पूजन,दुपारी १२ वाजता आरती,दुपारी १२.३० वाजता तिर्थप्रसाद,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद,सायंकाळी ४ वाजता महिला भजन मंडळ ( कडावल ) सायंकाळी ५ वाजता ( महिला मंडळ निरवडे यांचा ) हरिपाठ व आरती,सायंकाळी ५.३० वाजता ह.भ.प.सौ.ललीन प्रभाकर तेली यांचे किर्तन,रात्री ७ वाजता आरती,रात्री ७.३० वाजता भजनांचा कार्यक्रम सोमवार १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती,सायंकाळी ७ वाजता आरती,रात्री ८ वाजता भजन व आरती,रात्री ९ वाजता खुली ग्रुप डान्स स्पर्धा प्रथम पारितोषिक १०,००० द्वितीय पारितोषिक ७,००० तृतीय पारितोषिक ५,००० हजार रुपये मंगळवार १८ रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम,सायंकाळी ७ वाजता हरिपाठ व आरती,रात्री ८ वाजता लिलाव,रात्री ९ वाजता मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे यांचा “ महावीर बर्बरिक “ हा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन साटम महाराज कला क्रिडा मंडळ निरवडे यांनी केले आहे.