For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शशीकुमार उपांत्यपूर्व फेरीत

06:24 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
शशीकुमार उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

भारताच्या सुमित नागलने चेन्नई ओपन एटीपी स्पर्धेत याआधीच उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्याच्याप्रमाणे शशीकुमार मुकुंदने शेवटच्या आठ फेरीत प्रवेश मिळविला आहे.

शशीकुमारने ट्युनिशियाच्या मोएझ एचारगुइचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये मोएझने त्याची लवकर सर्व्हिस भेदली. पण लवकरच शशीकुमारने नियंत्रण मिळविले. बॅकहँड फटक्यांचा भडिमार व जोडीला फोरहँडचे फटके याच्या बळावर शशीकुमारने आठव्या गेममध्ये मुसंडी मारत 4-4 अशी बरोबरी साधली. हाच जोम कायम राखत त्याने तीन बिनतोर्ड सर्व्हिस करीत आघाडी मिळविली आणि ती अखेरपर्यंत कायम राखत विजय साकार केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.