अजित पवार गट ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वेश पावसकर
कुडाळ -
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्ष ओबीसी सेल सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्षपदी सर्वेश पावसकर ( पावशी - कुडाळ ) यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री पावसकर याना नियुक्ती पत्र देण्यात आले. खासदार आनंद परांजपे ,पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य सुरज चहाण, वैभव आखाडे यांची प्रमुख होती. मुंबई येथील देवगीरी निवासस्थानी येथे ही निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी कुडाळ शहराध्यक्ष विराज बांदेकर,अल्पसंख्याक उपाध्यक्ष जावेद मेमन , संचित पावसकर, पिंट्या पावसकर, अस्लम खतीप, राजू झाडपवार , सनी मोरे व अन्य पदाधिकारी होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा युवक अध्यक्षपदाची जबाबदारी श्री पावसकर यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.पक्ष संघटना बळकटीसाठी त्यांच्यावर आता ओबीसी सेलची जिल्हा पातळीवरची जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान ,अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सुनील तटकरे यांच्या मान्यतेने तसेच अबीद नाईक व आपले मार्गदर्शक काका कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपणावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.आपण अबीद नाईक व काका कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटी साठी अभिप्रेत काम करणार असल्याचे श्री पावसकर यांनी सांगितले.