For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोंडुरेतील कथाकथन स्पर्धेत सार्थक वालावलकर,वीरा वाईरकर प्रथम

कोंडुरेतील कथाकथन स्पर्धेत सार्थक वालावलकर वीरा वाईरकर प्रथम
Advertisement

न्हावेली /वार्ताहर : विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती,वक्तृत्व कौशल्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोंडुरे येथील पारिजात मंगल कार्यालय येथे कै. विद्याधर शिरसाट स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांसाठी भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेला सावंतवाडी तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ही स्पर्धा पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटांत घेण्यात आली. स्पर्धेची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व कै.शिरसाट यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.व्यासपीठावर आरोस विद्यालयाचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, जनता विद्यालय तळवडेचे प्रसाद आडेलकर,सागर कानजी, अमोल आरोसकर, दांडेली शाळेच्या शिक्षिका शर्मिला पारिपत्ये,साटेली तर्फ सातार्डा शाळेच्या अस्मिता आरोसकर, माजी केंद्रप्रमुख स्मिता नाईक, मळगाव रस्तावाडी शाळेचे दत्तगुरू कांबळी, रुपेश सावंत, अर्जुन मुळीक आदी उपस्थित होते.या स्पर्धेत पहिली ते चौथी गटात अनुक्रमे सार्थक वालावलकर,ओवी आडेलकर, कविराज मालवणकर तर उत्तेजनार्थ श्राव्या जाधव, सानवी शिरोडकर तसेच विशेष पारितोषिक रुची बर्डे यांनी यश मिळविले.पाचवी ते सातवी गटामध्ये अनुक्रमे वीरा वाईरकर, यश सावंत,वैदेही कामत तर उत्तेजनार्थ यशश्री आरोलकर, साजो मुळीक.तसेच,विशेष पारितोषिक गायत्री शेणई यांना गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी अनिरुद्ध शिरसाट यांच्याकडून स्पर्धेसाठी पारितोषिके पुरस्कृत केली.परीक्षक म्हणून स्मिता नाईक, दत्तगुरू कांबळी यांनी काम पाहिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.