Sarpanch Election 2025: सरपंच पदाच्या फेर आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये नाराजी
उमेदवारांना या फेरआरक्षणामुळे मोठा धक्का बसला आहे
By : सागर लोहार
व्हनाळी : सरपंचपदाच्या आरक्षणात पुन्हा बदल झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेल्या आणि त्या त्या प्रवर्गातून निवडणूक लढवण्याची आशा असलेल्या उमेदवारांना या फेरआरक्षणामुळे मोठा धक्का बसला आहे.
या फेरआरक्षणामुळे सर्वात मोठी चिंता ही आहे की, 'खऱ्या प्रवर्गाला न्याय मिळेल का? ज्या प्रवर्गासाठी जागा आरक्षित केली जाते, त्याच प्रवर्गातील योग्य आणि पात्र व्यक्तीला संधी मिळणे अपेक्षित असते. परंतु अन्य ओपन प्रवर्गातील काही लोक मागासवर्गीय प्रवर्गातील दाखले काढून निवडणूक लढवतात यामुळे खऱ्या प्रवर्गातील व्यक्तीवर अन्याय होतो.
आरक्षणात वारंवार झालेल्या बदलांमुळे इच्छुकांना आपल्या सामाजिक आणि राजकीय भवितव्याबाबत अनिश्चितता जाणवत आहे. अचानक बदललेल्या सरपंच पदाच्या आरक्षणामुळे, ज्यांनी आतापर्यंत खूप मेहनत घेतली होती, गाठीभेटी घेतल्या जेवणावळी केली. पैशाची यंत्रणा लावली आणि निवडणूक नुसती लढवायची नाही तर ती जिंकायची तयारी केली होती.
त्यांचे सर्व प्रयत्न स्वप्न एका क्षणात वाया गेले आहेत. काही गावांमध्ये तर आरक्षणाच्या बदलामुळे निवडणुकीचे संपूर्ण चित्रच पालटले आहे. सरपंच पदाच्या फेर आरक्षण सोडतीमुळे पॅनलमधून सरपंच पदासाठी निवडलेल्या उमेदवारांची या निर्णयामुळे गोची झाली आहे.
आधीच्या सोडतीत आरक्षित असलेले सरपंच पद बदलल्याने शेकहो उमेदवार आता निवडणूक रिंगणातून बाहेर पडणार असल्याने त्यांची भ्रमनिराशा झाली आहे. मात्र कांडी फेर आरक्षणातून ओबीसी प्रवर्गातील गरीबांना गावच्या लोकनियुक्त सरपंच पदाची संधी मिळणार असल्याने या निर्णयाचे स्वागत ही होताना दिसत आहे.
होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत जे खया अर्थान त्या आरक्षित प्रवर्गात येतात, त्यांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाला तरच या आरक्षणाचा फायदा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला होणार आहे. न पेक्षा बोगस दाखले काढून स्वतःला पुढारी समजणाऱ्यांना राजकिय वरदहस्तातून सरपंच पदाचा लाभ होईल.
लोकनियुक्त सरपंच निवड थेट जनतेतून निवडला जाणार आणि सर्वसामान्य नागरिकांना संधी मिळणार अशी अपेक्षा होती. पण या निर्ध्यामुळे सर्वसामान्यांना सरपंच पदाची संधी कोठीच मिळाली नाही. कारण मागील पंचवार्षिक निवडणूकीत अनेक ठिकाणी दोन्ही उमेदवार हे आर्थिक परिस्थीतीने मक्कम असल्याने मतदारांना जेवणावळी, पैसा, वस्तुंचे वाटप केल्याने सरपंच पदाची ही निवडणूक
ग्रामपंचायातीपुरती मर्यादीत न राहता मुख्यमंत्री पदाची असल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच पदासाठी सर्वसामान्यांचा टिकाव लागणार तरी कसा अशा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ज्या गावपुढाऱ्यांनी गेली अनेक वर्षे ही पदे भोगली आहेत. त्यांनी होतकरू युवक-युवतींना येत्या ग्रामपंचायतीमध्ये संधी द्यावी आणि गावचा सर्वांगिण विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
उपसरपंच पदासाठी घोडेबाजार
काही ग्रामपंयातीमध्ये एका पक्षाची किंवा अनेक पक्षाची सत्ता असते त्याठिकाणी रोटेशन प्रमाणे उपसरपंचपव इतर सवस्यांना विले जाते. काही ठिकाणी उपसरपंचपवासाठी वेखील ईर्षा पनाला लावून या पवासाठी लाखो रूपयांचा घोडोबाजार झाल्याचे चित्र आहे.
विकासाल खो
तालुक्यात मागील पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूकीत काही ठिकाणी बुरंगी लढती झालेल्या आहेत. त्यामध्ये एकहाती सत्ता आपल्या गटाकडे ठेवण्यात अनेकांना यश आले आहे. परंतू काही ठिकाणी संपूर्ण पॅनेल एका गटाचे तर लोकनियुक्त सरपंच हा वुसऱ्या गटाचा निवडून आल्याने गावच्या विकासकामाला खो बसला आहे.