मातोंड येथे १३ एप्रिल पासून सरपंच दशावतार नाट्यमहोत्सव
न्हावेली / वार्ताहर
श्री देवी सातेरी युवक कला क्रिडा मंडळ मातोंड व भारतीय जनता पार्टी मातोंड सातेरी मंदिर नजिक मातोंड येथे १३ ते १८ एप्रिल रोजी सरपंच दशावतार नाट्यमहोत्सव होणार आहे. पुढील कार्यक्रम - १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ,वालावल यांचा ‘ हर्षदा पुनर्जन्म ‘ १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ,म्हापण यांचा ‘ संत गोमाई ‘ १५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ,नेरुर यांचा ‘ शतग्रीव संहार ‘ १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता श्री दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ,सिंधुदुर्ग यांचा ‘ शेषाद्यज गणेश ‘ १७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाटय मंडळ,चेंदवण यांचा ‘ भूताचे लग्न ‘ १८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ,इन्सुली यांचा ट्रिकसीन नाटक ‘ तोची एक समर्थ ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे