For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सप उमेदवारांकडून महिलांना साड्याचे वाटप

05:47 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
सप उमेदवारांकडून महिलांना साड्याचे वाटप
Advertisement

मध्यप्रदेशातील हायप्रोफाइल मतदारसंघ बुधनीमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे वैराग्यानंतर गिरी उर्फ मिर्ची बाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात समाजवादी पक्षाचे उमेदवार स्वत:च्या जनसंपर्कादरम्यान साड्यांचे वाटप करताना दिसून येत आहेत.

Advertisement

एक संत पहिल्यांदाच तुमच्या द्वारावर आला असल्याचे मिर्ची बाबा महिलांना उद्देशून म्हणत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते. संतांना निवडणुकीत उतरावे लागत आहे. राज्यात गौमातेसाठी काहीच नाही, व्यापार नाही, रोजगार नाहीत. यामुळे संत जे काही करेल ते सर्वसामान्यांसाठी करणार असल्याचे मिर्ची बाबा लोकांना सांगत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते. मिर्ची बाबा यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.