महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सार्दिन, चोडणकर यांच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी चुरस

06:34 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ मडगाव

Advertisement

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी दक्षिण गोव्यात विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन व माजी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यामध्ये जोरदार चुरस आहे. फ्रान्सिस सार्दिन हे विद्यमान खासदार असल्याने पक्ष त्यांना सहजासहजी उमेदवारी नाकारू शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. सार्दिन यांना पक्षाने उमेदवारी नाकारली तर गिरीश चोडणकर यांना उमेदवारी मिळू शकते.

Advertisement

काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, काँग्रेस पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी आणखी कालावधी लागू शकतो. दक्षिण गोव्यातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी एल्विस गोम्स व कॅप्टन विरिएतो फर्नांडिस हे देखील दावेदार आहेत. परंतु, सध्याच्या स्थितीत विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन व गिरीश चोडणकर यांच्यामध्ये चुरस आहे.

खासदार सार्दिन यांना अल्पसंख्याक मतदारांचा पाठिंबा आहे. तसेच बऱ्याच प्रमाणात हिंदू मतदारांचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळेच त्यांनी दक्षिण गोव्यातून यापूर्वी विजय संपादन केला होता. गिरीश चोडणकर यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना हिंदू मतांवर जास्त भर द्यावा लागणार आहे. ते स्वत: भंडारी समाजातील असल्याने मडकई, फोंडा, शिरोडा, सावर्डे, सांगे, केपे, काणकोण तसेच मडगाव मतदारसंघात त्यांना बऱ्यापैकी मते प्राप्त करावी लागणार आहेत.

दुसऱ्या बाजूने भाजपने अद्याप आपला दक्षिण गोव्यातील उमेदवार निश्चित केलेला नाही. दक्षिण गोव्यातून अॅड. नरेंद्र सावईकर, चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, दिगंबर कामत, दामू नाईक व रमेश तवडकर यांच्या नावाची पक्षाने शिफारस केली होती. या पाच नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार असले तरी नक्की उमेदवारी कुणाला मिळणार हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article