महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काकती क्रिकेट स्पर्धेत सरस्वती संघ विजेता

09:55 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शक्ती स्ट्रायकर्स उपविजेता

Advertisement

वार्ताहर /काकती

Advertisement

येथील सिध्देश्वर स्पोर्ट्स क्लब काकती यांच्यावतीने या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात आला. या क्रिकेट स्पर्धेत काकती गावमर्यादित 8 संघांनी भाग घेतला. अंतिम सामना सरस्वती क्रिकेट संघ व शक्ती स्ट्रायकर्स यांच्यामध्ये झाला.  यात सरस्वती क्रिकेट संघ यांनी बाजी मारून प्रथम पारितोषिक पटकावले. तर द्वितीय शक्ती स्ट्रायकर्स यांनी मिळविले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणच्या अध्यक्षस्थानी युवा नेते राहुल जारकीहोळी होते.  पहिले बक्षीस जि. पं. माजी सदस्य सिद्दगोडा सुणगार तर दुसरे बक्षीस ग्रा. पं. अध्यक्षा  वर्षा मुचंडीकर यांनी दिले.  यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मुचंडीकर, युवा कार्यकर्ते सागर पिंगट, ग्रा. पं. माजी अध्यक्ष सुनिल सुणगार, नितिन पिंगट  व ग्राम पंचायत सदस्य  व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article