For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्व नेमबाजीत सरबजोतला सुवर्ण

06:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
विश्व नेमबाजीत सरबजोतला सुवर्ण
Advertisement

वृत्तसंस्था /म्युनिच

Advertisement

येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारात भारताचा नेमबाज सरबजोत सिंगने सुवर्णपदक पटकावले. गुरुवारी झालेल्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारातील अंतिम लढतीत 22 वर्षीय सरबजोत सिंगने 242.7 अशी शॉट्सची नोंद करत सुवर्णपदक पटकाविले. अंतिम फेरीत विविध देशांच्या आठ नेमबाजांचा समावेश होता. चीनच्या शुएहँगने रौप्यपदक तर जर्मनीच्या रॉबिन वॉल्टरने कास्यपदक पटकाविले. जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी ही पात्रतेची नेमबाजी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. सरबजोत सिंगचे विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील वैयक्तिक गटातील हे दुसरे सुवर्णपदक आहे. गेल्या वर्षी भोपाळमध्ये झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकाविले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.