राजकारणात प्रवेश करू शकते सारा
कोलंबिया विद्यापीठातून इतिहास अन् पॉलिटिकल सायन्सची पदवीधर
अभिनेत्री सारा अली खानचे दोन चित्रपट ‘मर्डर मुबारक’ आणि ‘ए वतन मेरे वतन’ हे ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांद्वारे अभिनेत्रीने काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न केला आहे. 15 मार्च रोजी प्रदर्शित झालेला मर्डर मुबारक हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर धाटणीचा होता. तर ए वतन मेरे वतन या चित्रपटात साराने स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.
साराने अलिकडेच एका मुलाखतीत राजकारणावर भाष्य केले आहे. तिला राजकारणात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने भविष्यात यासंबंधी निर्णय घेऊ शकते असे उत्तर दिले आहे. साराने कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राजशास्त्राची पदवी मिळविली आहे.
अभिनेत्रीने यापूर्वी देखील कधी ना कधी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. राजकारण हा काही बॅकअप प्लॅन नाही तसेच मी बॉलिवूड सोडणार नाही. जोपर्यंत बॉलिवूडमध्ये काम मिळत राहील तोपर्यंत येथे काम करत राहणार असल्याचे साराने म्हटले आहे.