For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सारा अर्जुनला मिळाला मोठा चित्रपट

06:25 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
सारा अर्जुनला मिळाला मोठा चित्रपट
Advertisement

राम चरणच्या आगामी चित्रपटात नायिका साकारणारबालकलाकार ते मुख्य नायिका असा प्रवास केलेल्या सारा अर्जुनला धुरंधरच्या यशानंतर आणखी एक मोठा चित्रपट मिळाला आहे. सारा ही धुरंधर, धुरंधर 2 चित्रपटानंतर उदयोन्मुख कलाकारांच्या यादीत सामील झाली आहे. आता ती राम चरणच्या चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement

राम चरण ‘पुष्पा द राइज’चा दिग्दर्शक सुकुमारसोबत नवा चित्रपट करत आहे. याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु आता या चित्रपटाशी सारा अर्जुनचे नाव जोडले गेले आहे. सारा अर्जुनला या चित्रपटाची कथा पसंत पडली आहे. परंतु यासंबंधी अधिकृत घोषणा झालेली नाही. या चित्रपटाचे चित्रिकरण चालू वर्षीच सुरू होणार आहे. पे•ाrच्या प्रदर्शनानंतर राम चरणने दुखापतीमुळे ब्रेक घेतला होता आणि आता तो ‘आरसी 17’ असे तात्पुरते नाव ठेवलेल्या चित्रपटाच्या चित्रिकरणाची तयारी करत आहे. हा चित्रपट 2028 मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

सारा अर्जुन याचबरोबर संजय लीला भन्साळी यांच्याकडून निर्मित मधुबाला यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के. रीन करणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.