रणवीरसोबत जमणार सारा अर्जुनची जोडी
संजय दत्त, आर. माधवनही दिसणार
अभिनेता रणवीर सिंह हा दिग्दर्शक आदित्य धर याच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल हे कलाकारही असणार आहेत. आदित्यने या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये रणवीरसोबत रोमँटिक मुख्य भूमिकेसाठी सारा अर्जुनची निवड केली आहे.
हिंदी आणि तेलगू चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून ओळख निर्माण केल्यावर सारा अर्जुन आता मुख्य नायिका म्हणून झळकणार आहे. स्वत:च्या कारकीर्दीतील या नव्या अध्यायाला सुरू करण्यासाठी ती उत्साहित आहे.
सारा अर्जुनने सलमान खानचा जय हो आणि तापसी पन्नूचा सांड की आंख यासारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तसेच मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेलवन या चित्रपटात तिने अभिनय केला आहे. सारा केवळ 20 वर्षांची आहे. तर रणवीर पुढील वर्षी 40 वर्षांचा होणार आहे.
आदित्यच्या या चित्रपटात रणवीर हा एका गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारतोय. माधवन आणि अर्जुय रामपाल देखील भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या सदस्यांच्या भूमिकेत असतील. तर संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.