For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘उडता तीर’मध्ये सारा अली खान

06:13 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘उडता तीर’मध्ये सारा अली खान
Advertisement

आयुष्मान खुरानासोबत मुख्य भूमिकेत

Advertisement

धर्मा प्रॉडक्शन्स आणि सिखिया एंटरटेन्मेंटने स्वत:चा नवा प्रोजेक्ट ‘उडता तीर’ची घोषणा केली आहे. हा एक स्पाय कॉमेडी चित्रपट असून यात आयुष्मान खुराना आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. किल, ग्यारह ग्यारह आणि द लंचबॉक्सनंतर या दोन्ही प्रॉडक्शन हाउसदरम्यान हा चौथा संयुक्त प्रोजेक्ट आहे.

आयुष्मान आणि साराचा चालू वर्षात प्रदर्शित होणारा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी पती, पत्नी और वो दो या चित्रपटात एकत्र काम केले असून तो 15 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रकुल प्रीत आणि वामिका गब्बीही दिसून येणार आहे.

Advertisement

उडता तीर या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबई आणि दिल्लीत झाले आहे. कथित विलंबानंतर प्रॉडक्शन टीमने मार्चच्या प्रारंभी याचे चित्रिकरण पुन्हा सुरू केले होते. आयुष्मा आणि साराने गाण्याचे चित्रिकरण केवळ दोन दिवसांमध्ये पूर्ण केले आहे.

Advertisement
Tags :

.