सारा अली खानला मिळाला नवा बॉयफ्रेंड
काँग्रेस नेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अभिनयासोबत स्वत:च्या खासगी आयुष्यावर चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे पोस्ट व्हायरल होत असतात. सारा सध्या मॉडेल अर्जुन प्रताप बाजवाला डेट करत असल्याचे मानले जात आहे. सारा आणि अर्जुन प्रताप बाजवा हे दोघेही स्वत:चे नाते सध्या गुप्त ठेवू इच्छितात. परंतु दोघेही अनेकदा एकत्र दिसून आले आहेत.
सारा आणि अर्जुनने अलिकडेच राजस्थानमधील छायाचित्रे शेअर केली आहेत. दोघांनी राजस्थानच्या हॉटेलमधून स्वत:च्या इन्स्टाग्राम स्टोरीज शेअर केल्या आहेत. यापूर्वी सारा अली खान आणि अर्जुन प्रताप बाजवा हे एकाचवेळी केदारनाथ येथे दिसून आले होते. काँग्रेस नेता असलेल्या अर्जुन प्रताप बाजवाने साराप्रमाणेच केदारनाथ येथील छायाचित्रे शेअर केली होती.
सारा अली खान सध्या स्काय फोर्स या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा अक्षय कुमारसोबत दिसून येणार आहे. यापूर्वी अतरंगी रे या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. याचबरोबर सारा अली खान ही अनुराग बसूकडून दिग्दर्शित होणाऱ्या ‘मेट्रो.. इन दिनों’ या चित्रपटात दिसून येणार आहे.