For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ केळबाई मंदिरात 19 ऑगस्ट रोजी सात प्रहराचा सप्ताह

कुडाळ केळबाई मंदिरात 19 ऑगस्ट रोजी सात प्रहराचा सप्ताह
Advertisement

कुडाळ वार्ताहर : केळबाईवाडी येथील श्री देवी केळबाई मंदिरात १९ ऑगस्ट रोजी सात प्रहराचा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ रोजी सकाळी १० वाजता घटस्थापना, सायंकाळी ४ वाजल्यापासून पारंपारीक वारकरी भजने सादर होणार आहेत. यात यशवंत बुवा श्री विठ्ठल रखुमाई हरीनाम (गिरगांव), वेताळ बांबर्डे वारकरी संप्रदाय (वेताळ बांबर्डे), कोचरा भजन मंडळ (कोचरा-मायनेवाडी), सद्‌गुरू वारकरी दिंडी भजन मंडळ, कुडाळ (बुवा विशाल राणे), श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक वारकरी भजन मंडळ (म्हापण पंचक्रोशी), माऊली प्रासादिक भजन मंडळ (किनळोस), ब्राह्मण सेवा भजन मंडळ (खवणे-पागेरेवाडी) यांची काकड आरती होणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजल्यापासून आकर्षक दिंड्यांचा कार्यक्रम होणार आहे. यात आई केळबाई बाल मित्रमंडळ (केळबाईवाडी कुडाळ), श्री केळबाई युवक मित्र मंडळ (कुडाळ) व नाबरवाडी मित्र मंडळ (कुडाळ) यांच्या दिंडी सहभागी होणार आहेत. २० रोजी सकाळी ९ वाजता गोपाळकाला होणार आहे. या सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन, श्री देवी केळबाई उत्सव मंडळ (कुडाळ) च्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.