सान्या मल्होत्राने खोटी ठरवली तिची भविष्यवाणी !
मुंबई
सान्या मल्होत्राने, तिच्या उत्तम अभिनयामुळे आणि वेगळ्या धाटणीच्या सिनेमांच्या निवडीमुळे बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिला बॉलीवूडमधील उत्तम अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. तिने दंगल या सिनेमातून आमीर खान सोबत सिनेसृष्टीत पदार्पण केले. कटहल, सीक्रेट, पटाखा, बधाई हो, जवान यांसारख्या सिनेमांमधून तिने अभिनय कौशल्यही सिद्ध केले आहे.
पण याच सान्या मल्होत्राबद्दल सिनेसृष्टीत येण्याआधी एका ज्योतिषाने भाकित केले होते. सान्या कधीही अभिनेत्री होऊ शकणार नाही असे भविष्यवाणी वर्तविण्यात आली होती. पण मला विश्वास होता, कीम एकद दिवस अभिनेत्री नक्की बनेन, असे सान्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले.
आता सान्याची गणना बॉलीवूड मधल्या आघाडीच्या नायिकांमध्ये केली जाते. सान्याने आजवर आमिर, शाहरुख खान सोबत अनेक मोठ्या स्टार्ससोहत स्क्रिन शेअर केली आहे.