‘सुंदर पूनम’ मध्ये सान्या मल्होत्रा
ओटीटीवर येणार चित्रपट
‘सुंदर पूनम’ चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये सान्या मल्होत्रा ही नववधूच्या वेशात दिसून आली आहे. ती काही सामान्य वधू नसून तिच्या व्यक्तिरेखेला अनेक पदर असल्याचे पोस्टर पाहून वाटू लागते. सुंदर पूनम चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांना चकित करणारी असेल असे फर्स्ट लुकमुळे वाटते. या चित्रपटात थ्रिलर, सस्पेन्सचा डोस मिळणार आहे. सुंदर पूनमच्या फर्स्ट लुकमध्ये सान्या ही वधूच्या वेशात असून तिचा फोन सातत्याने वाजतोय, ज्यात सुंदर आणि राजू नावाच्या क्रमांकावरून फोन येत आहे. अखेर वधूच्या चेहऱ्यावर हास्य उमलते आणि मागून एक विवाहित जोडपे काश्मीरमध्ये गायब झाल्याचे वृत्त ऐकू येते.
गुंतवून ठेवणारी कहाणी
या चित्रपटात एक जोडपे काश्मीरमध्ये हनिमूनसाठी जाते. हनिमूनदरम्यान हे जोडपे बेपत्ता होते, याचबरोबर वधू पूनमशी निगडित एक अंगावर काटा आणणारे सत्य समोर येते. यात तिची ध्यासयुक्त प्रेमकहाणी असून जटिल भूतकाळ आहे, जो प्रेक्षकांसाठी चकित करण्यासाठी पुरेसा आहे.
ओटीटीवर येणार चित्रपट
‘सुंदर पूनम’ चित्रपटात सान्या मल्होत्रासोबत आदित्य रावल आणि विक्रम मल्होत्रा देखील दिसून येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुलकित यांनी केले आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.