For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संतोष पाटील साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी

01:59 PM Jan 03, 2025 IST | Radhika Patil
संतोष पाटील साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी
Advertisement

सातारा : 

Advertisement

महाराष्ट्रात विविध पदावर कामकाज केलेले संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. ते पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदी होते. तर सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे. संतोष पाटील हे सोलापूर जिह्यातील बार्शी तालुक्यातील उंडेगावचे आहेत. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील असे सांगण्यात आले आहे.

सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा जिह्यात पदभार स्वीकारल्यानंतर सांगली जिह्यात ज्याप्रमाणे स्मार्ट शाळा करण्याचा प्रयोग केला तसाच प्रयोग साताऱ्यात करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पुढे नेटाने सुरु ठेवले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील अतिक्रमण, प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्यात आले. लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक शांततेत पार पडली. मतदानाचा टक्का वाढवण्यात यश आले. त्यांनी सातारा जिह्यात अनेक महत्वाचे प्रयोग राबवले गेले. त्यांची बदली पुणे येथे डॉ. सुहास दिवसे यांच्या जागी झाली आहे. तर पुण्यातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील हे साताऱ्याला जिल्हाधिकारी म्हणून आलेले आहेत. पुण्याच्या अगोदर संतोष पाटील हे कोल्हापूरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2023 मध्ये होते. त्यानंतर ते उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून कार्यरत होते.

Advertisement

संतोष पाटील हे मूळचे उंडेगाव (ता. बार्शी) येथील आहेत. कार्यक्षम व मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे ते पदवीधर आहेत. 1995 मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी म्हणून निवड केली. 1996 मध्ये त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली. उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, विशेष भूमी संपादन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) व प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. यामध्ये पांढरकवडा, अकोला, नांदेड जिह्यांचा समावेश आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून 2016 साली बढती मिळाल्यानंतर त्यांनी 2016 ते 2018 या काळात नांदेड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. 2018 ते 2020 या काळात पिंपरी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. 2020 मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्यावर विभागीय उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तेथे त्यांनी 2022 पर्यंत काम पाहिले.

               संतोष पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे सहसचिव म्हणून कामकाज केले

मंत्रालयात काम करणारे अधिकारी साताऱ्याला आले की ते सर्वसामान्य जनतेशी नाळ ठेवून काम करतात. त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांचा समावेश होतो. आताही साताऱ्याला बदलून आलेले संतोष पाटील हे मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात सहसचिव म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांना मंत्रालयातील आणि विशेष म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. त्यामुळे साताऱ्याला नव्याने मिळालेले जिल्हाधिकारी संतोष पाटील हे चांगले असावेत, अशी चर्चा सुरु आहे.

Advertisement
Tags :

.