For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri : असगोली जि. प. गटात संतोष जैतापकर यांचा प्रचार झंझावात

03:46 PM Feb 02, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri   असगोली जि  प  गटात संतोष जैतापकर यांचा प्रचार झंझावात
Advertisement

                        असगोलीत परिवर्तनासाठी संतोष जैतापकर यांची हाक

Advertisement

गुहागर : कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केवळ वैद्यकीय सेवेतून सर्वसामान्यांपासून सर्वच स्तरातील जनतेसाठी वैद्यकीय सेवेचे दूत ठरलेले युतीमधील शिवसेनेचे असगोली जि. प. गटाचे उमेदवार संतोष जैतापकर यांनी प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. मतदारांनीही आपल्याला परिवर्तन आवश्यक आहे असा सूर लावल्याने प्रस्थापितांची दमछाक झाल्याचे पहावयास मिळत आहे.

गुहागर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जात आहे. इतरांवर टीका करण्यापेक्षा अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या असगोली जि. प. गटातील जनतेच्या समस्यांकडे त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. 12 गावांनी तयार झालेला असगोली जि. प. गटातील प्रत्येक गाव व वाडय़ांमध्ये जैतापकर यांनी पोहचण्यासाठी यंत्रण राबविली आहे. भाजप, शिवसेना व आरपीआय(अ) या युतीमधील सर्वच पदाधिकारी प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झाले आहेत. गाव, वाडीवार पोहोचताना अनेक समस्या येथील ग्रामस्थ मांडत आहेत. केंद्र व राज्यात सत्ता असल्याने या समस्या सोडविण्याचा आपण प्रयत्न करू, असे जैतापकर यांनी म्हटले आहे. कोविड योद्धा म्हणून ओळख संतोष जैतापकर यांची कोविड योद्धा म्हणून ओळख आहे.

Advertisement

कोणत्याही शासकीय निधीचा वापर न करता कोविड काळात वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे काम जैतापकर यांनी केले आहे. आजही हे काम अविरतपणे सुरू आहे. गुहागर तालुक्याबरोबर खेड, रत्नागिरी व मुंबई या ठिकाणी जैतापकर यांची वैद्यकीय टीम कार्यरत आहे. असगोली जि.प. गटातून जैतापकर यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिणामी संतोष जैतापकर यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. असगोली गटात संतोष जैतापकर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते राजेश बेंडल, तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, भाजपचे यशवंत बाईत, माजी सभापती विठ्ठल भालेकर, आत्माराम मोरे, गुहागर नगरपंचायतीचे नगरसेवक, अमरदीप परचुरे, रोहन भोसले वैभव, आदवडे आदी शिवसेना, भाजप तसेच आरपीआय (अ) चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठय़ा प्रमाणात यात सहभाग आहे.

Advertisement
Tags :

.